Navrtari 2023 : नवरात्रीत उपवास करताना 'या' पदार्थांचं जास्त सेवन करू नका; फायद्याऐवजी होईल नुकसान
Navratri Fasting Food : उपवासात खाल्लेले पदार्थ आपल्यासाठी फायदेशीर आहेत की हानिकारक या संदर्भात जाणून घ्या.

Navratri Fasting Food : नवरात्रीच्या उत्सवाला आता सुरुवात होणार आहे.या नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची भक्ती, पूजा आणि उपवास केले जाणार आहेत. अशा वेळी उपवासाच्या पदार्थांचं सेवन तर केलं जाईलच पण ते योग्य प्रमाणात खाणं देखील गरजेचं आहे. उपवासात खाल्लेले पदार्थ आपल्यासाठी फायदेशीर आहेत की हानिकारक? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
साबुदाणा
साबुदाण्यात स्टार्चचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर पाण्याची जास्त तहान लागते. साबुदाण्यात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे याचे सेवन कमी प्रमाणातच करा.
आरोग्यदायी - साबुदाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका. साबुदाणा खाल्ल्यानंतर घसा कोरडा होत असेल तर जास्त पाणी प्या. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे ते साबुदाण्याचे सेवन करू शकतात.
किती खावे - अर्धा किंवा एक वाटी भिजवलेला साबुदाणा खाणं आरोग्यासाठी चांगला आहे.
राजगिरा
राजगिरा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आरोग्यदायी - राजगिरा आरोग्यासाठी फार चांगला आहे. यामध्ये कमी कॅलरीज असतात. त्यात प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे सूज कमी होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
किती खावे - एका व्यक्तीसाठी एकूण 35 ते 40 ग्रॅम भाग पुरेसा असेल.
काजू
उपवासात ड्रायफ्रूट्सचे सेवन भरपूर केले जाते. हे तुपात तळण्याऐवजी भाजून खा. ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्याने ऊर्जा मिळते.
आरोग्यदायी - तळल्यानंतर खाऊ नका, अन्यथा अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
किती खावे - मूठभर काजू दिवसभरासाठी पुरेसे असतात. मखानाचे जास्तीत जास्त सेवन करा, कारण त्यात कमी कॅलरीज असतात. तसेच, त्यात सोडियम आणि फॅट्स अजिबात नसतात. यामध्ये फायबर, लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते.
भाजी
बटाटा - जर बटाटा योग्य प्रकारे खाल्लात तर तुम्ही निरोगी राहू शकता. तळलेले बटाटे, चिप्स खाण्याऐवजी उकडलेल्या बटाट्याचं सेवन करा.
रताळे - रताळ्यामध्ये बटाट्यापेक्षा जास्त कॅलरीज असतात. परंतु, त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
कच्ची केळी - कच्च्या केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करतात.
दुग्ध प्रोडक्ट्स
घरच्या घरी पनीर तयार करण्याचा प्रयत्न करा कारण बाहेरील पनीरमध्येही चरबीचे प्रमाण जास्त असते. तसेच, उपवास दरम्यान चीजचे सेवन केल्याने तुम्हाला प्रोटीनची कमतरता जाणवत नाही.
आरोग्यदायी - यामध्ये आढळणारे सेलेनियम नावाचे अँटीऑक्सिडंट दीर्घकाळ निरोगी राहते. चीज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे दुधाचे कच्चे सेवन केल्यास बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
नारळ
कोलेस्ट्रॉल मुक्त असण्याव्यतिरिक्त, नारळात सोडियम देखील असते, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय, ते रक्त शुद्ध करते आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
आरोग्यदायी - नारळ पाण्याचे सेवन आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. मधुमेही रुग्णांनी त्याचे सेवन कमी करावे कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते.
किती प्यावे - दिवसाला एक ते दोन नारळ पाणी























