Navratri 2024 Travel: देवीचं अनोखं मंदिर, जिथे भगवान गणेश आहेत पहारेकरी! 'या' एका गोष्टीशिवाय दर्शन अशक्य, पद्मपुराणातही उल्लेख
Navratri 2024 Travel: नवरात्रीच्या या शुभमुहूर्तावर तुम्हीही देवीच्या दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल, आज आम्ही तुम्हाला एका खास मंदिराबद्दल सांगणार आहोत.
Navratri 2024 Travel: भारतात देवीची अनेक मंदिरं आहेत. जिथे केवळ दर्शनाने भाविकांच्या सर्व अडचणी दूर होतात. सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. असं म्हणतात की, नवरात्रीच्या दिवसात देवीचं दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज आम्ही तुम्हाला एका खास मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे स्वत: भगवान गणेश या मंदिराचे पहारेकरी आहेत. या मंदिराचा इतिहास आणि भाविकांची श्रद्धा काय आहे? सविस्तर जाणून घेऊया...
नवरात्रीच्या काळात अवश्य द्या भेट
आम्ही ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत, ते मंदिर भारतातील उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे देवी विंध्यवासिनी विंध्याचलच्या नावाने प्रचलित आहे. जिथे तुम्ही या दिवसात अवश्य भेट द्यायला हवी, असं म्हणतात की येथे भगवान श्रीरामांनी पश्चिमेकडे शिवाची मूर्ती स्थापित केली होती. त्यामुळे हे ठिकाण रामेश्वर नावानेही प्रसिद्ध झाले आणि हे ठिकाण शिवपुरी म्हणून ओळखले जाते. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार ज्योतिषी पंडित अरविंद त्रिपाठी यांनी देवी विंध्यवासिनीच्या मंदिराबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
देवीचं दर्शन घ्यायचंय, तर एक गोष्ट नक्की करावी लागेल
जर तुम्ही देवी विंध्यवासिनी देवीच्या मंदिरात जाणार असाल तर सर्वात आधी श्री गणेशाचे दर्शन घ्या. विंध्यवासिनी देवीचे दर्शन तिच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानले जाते. प्रथम मंदिरात या, नंतर श्रीगणेशाची पूजा करा आणि नंतर माँ विंध्यवासीनीचे दर्शन घ्या. असे केल्याने भक्तांच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांना सुख-समृद्धीचे वरदानही प्राप्त होते.
महाभारत, पद्मपुराणातही उल्लेख
मिर्झापूरच्या विंध्य पर्वतावर वसलेल्या देवी विंध्यवासिनीचा महिमा अतिशय अनोखा आहे. या देवीच्या मंदिराचा उल्लेख महाभारत आणि पद्मपुराणातही आला आहे. देवीच्या या रूपाचे वर्णन सर्वत्र आढळते. देवी विंध्यवासिनीच्या पूजेबाबत असे म्हटले जाते की, सृष्टीच्या प्रारंभापासून देवीच्या या रूपाची पूजा केली जात आहे, तसेच या देवीमुळे विश्वाचा विस्तार झाल्याचे मानले जाते.
कंसाला जिने मृत्यूची भविष्यवाणी केली
देवी विंध्यवासिनीचे मंदिर महामाया आणि योगमायेच्या रूपानेही ओळखले जाते. तिची ओळख पराशक्ती अशी आहे. पौराणिक कथेनुसार, कंसाने जिला मारण्याचा प्रयत्न केला, ती देवी विंध्यवासिनी होती. त्याला मारण्यापूर्वीच तिने कंसाला आपल्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. असे मानले जाते की, महामारीच्या काळात विंध्यवासिनी देवीची पूजा केल्यास संकटे टळतात.
हेही वाचा>>>
Navratri 2024 Travel: नवरात्रीचा 4 दिवस, कुष्मांडा देवीचे एक अद्भूत मंदिर, जिथे साक्षात पिंडीच्या रूपात देवी विराजमान, पिंडीतून सतत वाहणाऱ्या पाण्याचे रहस्य काय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )