(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navratri 2023 : नवरात्रीत हा आहार फॉलो करा, तुमचं वजन किंचितही वाढणार नाही; जाणून घ्या संपूर्ण आहार चार्ट
Navratri 2023 : जर तुम्हीही उपवास ठेवत असाल आणि लठ्ठपणा आणि वजन वाढू नये असे वाटत असेल तर दिवसाच्या योग्य वेळी योग्य आहार घेणं गरजेचं आहे.
Navratri 2023 : शारदीय नवरात्री (Navratri 2023) उत्सावाला आजपासून सुरुवात झाली आहे. अशातच यापुढचे नऊ दिवस देवीचे उपवास पाळले जाणार आहेत. अशा परिस्थितीत फळे आणि आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्हीही उपवास ठेवत असाल आणि लठ्ठपणा आणि वजन वाढू नये असे वाटत असेल तर दिवसाच्या योग्य वेळी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. काही लोक उपावासाला फक्त फळं खातात, तर काही लोक उपवासाचे पदार्थ खातात. जसे की, साबुदाणा खिचडी, भजी, तांदूळ, भाजलेले शेंगदाणे, मखाना आणि पनीर यांचा देखील समावेश करतात. हे सर्व पदार्थ अनहेल्दी मानले जातात. अशा वेळी उपवासाच्या दिवसांत लठ्ठपणा वाढू नये म्हणून खाण्याच्या योग्य सवयी ठेवणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊयात उपवासाच्या दिवसात आहार कसा असावा.
साबुदाणा खिचडी खावी की खाऊ नये?
नवरात्रीच्या या दिवसांत वजन वाढू नये यासाठी आहारतज्ज्ञ सांगतात की, साबुदाण्याची खिचडी जड असल्याने त्यात उच्च कॅलरी सामग्री देखील आहे. अशा परिस्थितीत साबुदाण्याची खिचडी खाऊ नये. मसाल्यांबरोबर उकडलेले बटाट्याचे सेवन केल्याने कॅलरीजचे प्रमाणही खूप जास्त असते. त्यामुळे एकतर बटाटा खाणं टाळावे किंवा दिवसाच्या सुरुवातीलाच सेवन करावे.
नवरात्रीत फळांचा आहार कसा असावा?
नाश्ता
दुधाबरोबर सफरचंद, नाशपाती किंवा पपईसारखी कमी साखर आणि जास्त फायबर असलेली फळे खा.
संध्याकाळचा नाश्ता
बदाम, अक्रोड किंवा शेंगदाणे यांसारखे मिश्रित काजू काही दही किंवा दुधाबरोबर खा.
रात्रीचा आहार
- एक वाटी स्किम्ड पनीर, रायता खा.
- दूध आणि साखरेपेक्षा स्किम्ड मिल्क आणि स्टीव्हिया चांगले मानले जातात.
- दुधी किंवा गव्हाची खीर किंवा हलवा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.
- चव वाढवण्यासाठी फळांच्या डिशमध्ये साखरेऐवजी गुळाची पावडर वापरा.
नवरात्रीच्या उपवासासाठी फळांचे पदार्थ बनवण्याच्या टिप्स
- कोणतेही पदार्थ तळण्याऐवजी वाफवून घ्या.
- साखरेऐवजी, इतर पर्यायांवर लक्ष केंद्रित करा.
- साबुदाणा, मखाना आणि आर्बी यांसारख्या उच्च उष्मांकयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा.
- सुक्या मेव्यांऐवजी संपूर्ण फळे खा.
- फक्त स्किम्ड डेअरी उत्पादने घ्या.
- उपवासा दरम्यान, दिवसभर स्वतःला शक्य तितके हायड्रेटेड ठेवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :