Navratri 2022 : यंदाच्या नवरात्रीत पारंपरिक पेहरावाला द्या हटके लूक; फॉलो करा 'या' स्टायलिंग टिप्स
Dandiya Night Styling Tips : यंदाच्या नवरात्रीत तुम्हाला पारंपरिक पेहरावा बरोबरच त्याला जरा हटके लूक द्यायचा आहे. तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही खास स्टायलिंग टिप्स घेऊन आलो आहोत.
Dandiya Night Styling Tips : 26 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या नवरात्रीला (Navratri 2022) अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच दांडिया, गरबा प्रेमींना यावर्षी आपण इतरांपेक्षा जरा हटके दिसावं असं वाटणं साहजिकच आहे. कारण दांडिया आणि स्टायलिंग यांचं एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या दांडिया उत्सवाला खेळण्यासाठी तसेच पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी जमा होते. आणि दोन वर्षांनंतर यावर्षी मनसोक्त दांडिया खेळायला मिळणार त्यामुळे तरूणाईसुद्धा या उत्सवात कुठे मागे नाही.
यंदाच्या नवरात्रीत तुम्हाला पारंपरिक पेहरावा बरोबरच त्याला जरा हटके लूक द्यायचा आहे. तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही खास स्टायलिंग टिप्स घेऊन आलो आहोत. या लूकमुळे तु्म्ही नक्कीच चारचौघांत उठून दिसाल. चला तर मग पाहूयात दांडिया नाईटसाठी काही फॅशन स्टायलिंग टिप्स.
तुमच्या लूकला नवा ट्विस्ट द्या :
तुमच्याकडे आधीच हत्ती, मोर, फ्लॉवर लीफ प्रिंट यांसारख्या पारंपारिक आकृतिबंध असलेला गोटा स्कर्ट असेल तर तुम्हाला नवीन चनिया चोली खरेदी करण्याची गरज नाही. या चनिया चोलीबरोबर तुम्ही कोणत्याही ब्लाउज किंवा चोलीसोबत सेट करून तुम्ही खूप नवीन आणि सुंदर लूक मिळवू शकता. आजकाल तुम्हाला मल्टीकलर रेडिमेड ब्लाउज बाजारात सहज मिळतात. स्कर्टसोबत पेअर करून तुम्ही छान लूक कॅरी करू शकता.
कमर बेल्ट लावून करा स्टायलिश लूक :
सध्या बाजारात कमर बेल्टची खूप फॅशन आहे. याच कमर बेल्टपासून तुम्ही तुमची एक नवीन फॅशन तयार करू शकता. आणि आकर्षक लूक तयार करू शकता. यासाठी बाजारात मिळणारा चमकदार कमर पट्टा विकत घ्या. आणि त्याला तुमच्या चनिया चोलीवर, किंवा घागरा चोलीवर लावून स्टाईल करू शकता. यामध्ये बेल्ट रंगीबेरंगी फॅब्रिकचा असावा.
भडक रंग निवडा :
जर तुम्ही गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी स्वत:चे कपडे घालत असाल, तर तुम्ही फक्त भडक रंगांचीच निवड करा. असे कपडे रात्रीच्या वेळी अधिक सुंदर दिसतात. लाल, हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी यांसारख्या चमकदार रंगांनी तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवू शकता. यासोबतच चनिया चोलीचे भरतकाम, गोटा आणि मण्यांचे कामही खूप चांगले असावे हे लक्षात ठेवा. हे तुमचा लूक अतिशय पारंपारिक बनविण्यात मदत करेल.
बांगड्यांवर विशेष लक्ष द्या
आजकाल नवीन प्रकारचे बॅंगल्स बाजारात आले आहेत. यामध्ये रेशीम धाग्याचे काम केले जाते. तुम्ही तुमच्या ड्रेससोबत ही स्टाईल करू शकता. मुलींना बांगड्या हा प्रकार खूप आवडतो. तुमच्या ड्रेसनुसार तुम्ही कोणत्याही रंगीबेरंगी बांगडीचा सेट कॅरी करू शकता. यामुळे तुमचा लूक अधिक उठून दिसेल.
महत्वाच्या बातम्या :