National Tourism Day 2023 : पर्यटनाचं महत्त्व अधोरेखित करणारा राष्ट्रीय पर्यटन दिन; जाणून घ्या या दिनाचं महत्त्व
National Tourism Day 2023 : राष्ट्रीय पर्यटन दिवस भारतात पर्यटनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेत त्याची भूमिका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करतात.
National Tourism Day 2023 : दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस (National Tourism Day) भारतात पर्यटनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेत त्याची भूमिका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यासाठी साजरा केला जातो. अनेकांना फिरायला खूप आवडतं. पण, गेल्या अडीच वर्षांपासून कोविड-19 मुळे लोकांना फिरता येत नव्हतं. मात्र, यावर्षी कोरोना संसर्गापासून दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटनप्रेमींनी पर्यटनाला सुरुवात केली आहे. 25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त आज आपण पर्यटनाचे महत्त्व, उद्देश आणि इतिहास यांविषयी जाणून घ्या.
राष्ट्रीय पर्यटन दिवस 2023 चा इतिहास
जगातील बहुतेक देशांमध्ये 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो. पण भारतात राष्ट्रीय पर्यटन दिवस 25 जानेवारीला साजरा केला जातो. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा असल्याने, राष्ट्रीय पर्यटन दिवस स्वातंत्र्यानंतर लगेचच 1948 मध्ये सुरू झाला. त्याचे पहिले मुख्यालय दिल्लीत ठेवण्यात आले होते, परंतु नंतर ते मुंबईला हलविण्यात आले. तीन वर्षांनी म्हणजे 1951 मध्ये या समितीची आणखी दोन कार्यालये चेन्नई (मद्रास) आणि कोलकाता (कलकत्ता) येथे सुरू झाली. 1998 मध्ये, पर्यटन आणि दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पर्यटन विभागाची स्थापना करण्यात आली.
पर्यटन दिनाचे महत्त्व
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, भारताकडे एक बहुभाषिक, बहु-धर्मीय देश म्हणून पाहिले जाते, जिथे दर 5 किमी अंतरावर धर्म, बोली, भाषा आणि पेहराव बदलतो. अशीच काहीशी परिस्थिती भारतातील पर्यटन स्थळांची आहे. जिथे एकापेक्षा जास्त हिल स्टेशन, समुद्र किनारा, चहाचे मळे, राष्ट्रीय उद्यान, जगप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा, जगप्रसिद्ध जत्रा, बर्फाच्छादित मठ, प्राचीन तीर्थक्षेत्रे, ज्याला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. पर्यटन मंत्रालय (भारत सरकार) देखील 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'च्या अंतर्गत राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करत आहे. भारतातील असंख्य पर्यटन स्थळे येथे सांगितली जात आहेत.
पर्यटन दिनाचे उद्दिष्ट
राष्ट्रीय पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश भारतीय पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना जागतिक स्तरावर आणणे हा आहे. पर्यटन हा प्रमुख उद्योग असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे म्हटले जाते. या कामात राष्ट्रीय पर्यटन दिन महत्त्वाची भूमिका बजावतो. या दिवसाच्या माध्यमातून लोकांना जागतिक स्तरावर पर्यटनाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मूल्य किती आहे, याची जाणीव करून द्यावी लागेल. याशिवाय पर्यटनाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे. या विषयांवर जनजागृती करण्यासाठी, भारत सरकारकडून दरवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिन घोषित करण्यात आला.