National Space Day: आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन, वर्षभरापूर्वी आजच चांद्रयानाने केली होती ऐतिहासिक लँडिंग, जाणून घ्या
National Space Day: आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी, म्हणजे 23 ऑगस्ट 2023 रोजी, भारत चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश बनला होता.
National Space Day : आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे. आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी, म्हणजे 23 ऑगस्ट 2023 रोजी, भारत चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश बनला होता. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मिशनच्या विक्रम लँडरने (Vikram Lander) चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अवकाश दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी देशभरात विशेष उत्सव साजरा केला जात आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा 'भारत' पहिला देश
अंतराळ विज्ञानाकडे देशातील तरुणांची रुची वाढवणारा आणि अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणारा महोत्सव असल्याचं सांगण्यात येतंय. आज संपूर्ण देश ‘नॅशनल स्पेस डे’ साजरा करत आहे. या दिवशी 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोचे चांद्रयान-3 चे विक्रम रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश होता. आज चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अवकाश दिवस साजरा केला जात आहे.
चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ हा दिवस
चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ ISRO 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करत आहे. चंद्रावरील चांद्रयान-3 ची कामगिरीचं कौतुक सांगण्यासाठी आणि दाखवण्यासाठी आज दिल्लीतील भारत मंडपम येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चांद्रयान-3 मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर काय सापडले आणि त्याचे भविष्यात काय उपयोग होतील याबद्दल इस्रोकडून सांगण्यात येत आहे.
या दिवसाची थीम काय?
स्पेस डे सेलिब्रेशनबद्दल इस्रोनेही ट्विट केले आहे. या दिवसाची थीम ठेवण्यात आली आहे - 'India's Space Saga - Touching Lives while To Touching the Moon.' ISRO ने असेही लिहिले आहे की अवकाशाचा अभ्यास आपल्या जगाला आकार देतो आणि आपली कल्पनाशक्ती वाढवतो. भारताच्या अंतराळ प्रयत्नांच्या अतुलनीय प्रवासाचा आणि आमच्या जीवनावरील त्यांच्या प्रभावाचा गौरव करण्यासाठी आमच्यात सामील व्हा. आपण सर्वांनी एकत्र येऊन हा ऐतिहासिक दिवस अभिमानाने साजरा करूया!
देशभरात प्रदर्शन
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशभरात प्रदर्शने भरवली जात आहेत. यामध्ये चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगची माहिती दिली जात आहे. याशिवाय चंद्रावरील उतरल्यानंतर चांद्रयानाने काढलेली छायाचित्रेही दाखवण्यात येणार आहेत. या संदर्भात दिल्लीच्या भारत मंडपममध्ये एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू करत आहेत.
National Space Day - 2024
— ISRO (@isro) August 23, 2024
Is here!
Join the celebrations at https://t.co/msTmSmUJcY#NSpD2024@DrJitendraSingh
चित्रकला स्पर्धा देखील
राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त इस्रो देशभरातील मुलांना आकर्षित करणार आहे. विज्ञान विषयावर चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. इस्रोने या चित्रकला स्पर्धेची विजेती यादीही आपल्या पेजवर प्रसिद्ध केली आहे. जे तुम्ही isro.gov.in/NSPD2024/poster ला भेट देऊन पाहू शकता. यात बिहारच्या आशिता मतीनला प्रथम, कर्नाटकच्या हर्षिता कोकूने द्वितीय, तर पंजाबच्या अरमानदीप सिंगला तृतीय क्रमांक मिळाला आहे.
National Space Day 2024
— ISRO (@isro) August 20, 2024
Three days to go!
Here are the amazing posters that beautifully illustrate India's extraordinary journey in space exploration.
More posters: https://t.co/xNTiTYrQsK#NSpD2024 pic.twitter.com/KTRQak7Pwb