Mushroom Benefits : मशरूमचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य मशरूम कसा निवडावा? वाचा सविस्तर
Mushroom Benefits For Health : मशरूमचा आरोग्याच्या दृष्टीने कसा फायदा होतो. तसेच मशरूमची योग्य निवड कशी करावी या संदर्भातली माहिती जाणून घ्या.
Mushroom Benefits For Health : परदेशी संस्कृतीत वापरल्या जाणाऱ्या मशरूमचे (Mushroom) प्रमाण भारतीत लोकांमध्ये देखील वाढत चालले आहे. मशरूमची चव मुळातच तिखट असल्या कारणाने लोकांना ते खाण्यास आवडते. तर, अनेकांची चांगल्या आरोग्यासाठी मशरूमला पसंती असते. आजकाल बहुतेक पदार्थांमध्ये मशरूमचा वापर केला जातो. मग ते पिझ्झाचे टॉपिंग असो, सूप असो किंवा मशरूमची कोणतीही वेगळी डिश असो. आजकाल प्रत्येक पदार्थांत मशरूमचा वापर केला जातो. मशरूमचा आरोग्याच्या दृष्टीने कसा फायदा होतो. तसेच मशरूमची योग्य निवड कशी करावी या संदर्भातली माहिती जाणून घ्या.
1. हृदयरोगासाठी उत्तम :
मशरूममध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट शरीराला नुकसान करणाऱ्या रॅडिकल्सपासून आपले संरक्षण करते. यामुळेच हृदयविकार आणि कर्करोगासारख्या गंभीर समस्या टाळता येतात.
2. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत :
मशरूममध्ये असलेले बीटा ग्लुकन हे आहारातील फायबरचा एक प्रकार आहे. हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
3. रक्तदाब नियंत्रित करते
मशरूम पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जो शरीरातील सोडियमचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करतो. हे रक्तवाहिन्यांना देखील आराम देते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
4. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत :
मशरूममध्ये असलेले अँटिऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.
5. त्वचेच्या समस्यांवर देखील उपयुक्त :
सॉल्व्ह मशरूममध्ये असलेले पॉलिसेकेराइड त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. याव्यतिरिक्त, ते त्वचेला संसर्गापासून वाचवते.
योग्य मशरूम कसा ओळखावा?
यासाठी कोणत्याही बाजारातून तुम्ही ताजे मशरूम निवडा. ताजे मशरूम निवडताना त्याचा पृष्ठभाग मऊ आणि कोरडा असावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :