Monkeypox : मंकीपॉक्स होण्यापासून सावध राहण्याच्या पाच टिप्स, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Monkeypox : जगभरात अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर आता भारतात केरळमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झालं आहे.
Monkeypox : मंकीपॉक्स हा सामान्यत: 2 ते 4 आठवडे टिकणारा एक स्व-मर्यादित रोग आहे. मंकीपॉक्स संक्रमित व्यक्ती किंवा प्राणी किंवा संक्रमित प्राण्याने दूषित झालेल्या फोमाइट्सच्या जवळच्या संपर्कातून मानवांमध्ये पसरतो. मंकीपॉक्स विषाणू शरीरातील पुरळ किंवा फोड, शरीरातील द्रव, आणि पलंग यांसारख्या दूषित सामग्रीच्या जवळच्या संपर्काद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉ. हनी सावला यानी याबाबत प्रकाश टाकलाय. त्यांनी याबाबतच्या महत्वाच्या पाच बाबींचा उलगडा केलाय.
कोणत्याही विषाणूजन्य आजारासाठी काही मूलभूत पायऱ्या सारख्याच असतात जसे –
1)घरी बसून स्वतःला अलग करा.
2)ज्या लोकांना संसर्ग होऊ शकतो त्यांच्याशी त्वचेचा संपर्क टाळा.
3)साबण आणि पाण्याने हात चांगले धुवावे.
4)खोकताना किंवा शिंकताना रुमाल तोंडावर ठेवावा.
5)संशयित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नका.
दरम्यान, देशात मंकीपॉक्सचा (Monkeypox Virus) पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मंकीपॉक्सचा धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) मार्गदर्शक सूचना (Monkeypox Guidelines) जारी केल्या आहेत. जगभरात अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर आता भारतात केरळमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
- आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आजारी व्यक्तीसोबतचा संपर्क टाळावा. त्वचेशी आणि खाजगी भागांतील जखमा किंवा आजार असलेल्या व्यक्तीशीही संपर्क टाळावा.
- आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही जिवंत किंवा मृत सस्त प्राण्यासोबत संपर्क टाळावा. यामध्ये उंदीर, खार, माकड या प्राण्यांसोबत संपर्क टाळावा.
- जंगली प्राण्यांचे मांस खाणं टाळा.
- कोणत्याही आजारी व्यक्तीच्या वापरातील वस्तू वापरू नका.