आपल्या चिमुकल्यांच्या हातात स्मार्टफोन देताय, मग ही बातमी वाचाच...!
स्मार्टफोन (Mobile Smart Phones) आल्यापासून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय.लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईलचं व्यसन अनेकांना जडलं आहे. यात लहान मुलं हल्ली बराच वेळ मोबाईलमध्ये गुंतलेली दिसून येतात
न्यूयॉर्क: स्मार्टफोन (Mobile Smart Phones) आल्यापासून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईलचं व्यसन अनेकांना जडलं आहे. यात लहान मुलं हल्ली बराच वेळ मोबाईलमध्ये गुंतलेली दिसून येतात. लहान मुलं अनेकदा हट्ट करतात किंवा मोठ्यानं रडतात अशावेळी त्यांचे पालक आपल्याकडील स्मार्टफोन काढून त्यांच्या हातात देतात आणि त्यांना गप्प करतात. आजकाल हे दृश्य आपल्याला अनेकदा दिसून येतं. पण असं करणं योग्य नाही. एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.
अमेरिकेच्या बाल रोग अकादमीनं याबाबत दिशा निर्देश जारी केले आहेत. यानुसार, डिजिटल मीडियाचा जास्त वापर यामुळे मुलांची झोप, त्यांचा विकास आणि शारीरिक स्वास्थ बिघडविण्यास कारणीभूत ठरु शकतो. संशोधकांचं म्हणणं आहे की, पालकांनी आपल्या चिमुकल्यांना स्मार्टफोन अथवा डिजिटल उपकरणं देणं टाळावं.
अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठाचे केसी. एस. मोट बालरोग रुग्णालयाचे प्रमुख लेखक जेनी रडेस्की यांचं म्हणणं आहे की, अशाप्रकारचे उपकरणं वापरल्यानं मुलांच्या सहनशीलतेचा भावना कमी होऊ शकतात.
रडेस्की यांच्या मते, 'डिजिटल मीडिया हा अनेक चिमुकल्यांचा शाळेपासूनच अनिवार्य भाग बनला आहे. पण त्यामुळे त्याच्या बुद्धीविकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लहानपणी मुलांच्या बुद्धीचा विकास हा वेगाने होतो. त्यामुळे या वयात त्यांना अशा उपकरणांपासून थोडं लांब ठेवणं हेच योग्य आहे.'
मोबाईलचं व्यसन मुलांमध्ये भीषण पद्धतीनं वाढत आहे. मोबाईलमुळं मुलं मैदानी खेळांपासून दूर चालली असल्याचं देखील समोर येत आहे. मैदानी खेळ खेळण्याऐवजी मुलं तासनतास मोबाईलमध्ये गेम्स, व्हिडीओ पाहण्यात व्यस्त असल्याचं दिसून येतं. हे मुलांच्या विकासासाठी घातक असल्याचं देखील तज्ञ वारंवार सांगत आहेत. आजकाल ऑनलाईन शिक्षणामुळं मोबाईल मुलांना द्यावाच लागतो. मात्र आपल्या मुलांना आवश्यक असेल तेव्हाच मोबाईल देणं गरजेचं आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )