Mental Health : नव्या वर्षांत रहा टेन्शन मुक्त; 24 तासांत ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञांचा 'हा' सोपा मार्ग निवडा
Mental Health : तणावाचे अनेक प्रकार असतात पण मानसिक तणावाचा सर्वाधिक परिणाम होतो.
Mental Health : आजच्या काळात, जवळपास सर्वांनाच तणावाचा सामना करावा लागतोय. तणाव येणं ही जरी सामान्य बाब असली तरी हा तणाव कधी कधी इतका वाढतो की तो चारी बाजूंने डोळ्यांना अंधारी येते. तणावाखाली असलेल्या व्यक्तीला अनेकदा कमीपणा जाणवतो आणि त्याचा परिणाम त्याच्या कामावरही होतो. चिडचिड, थकवा, मूड स्विंग्स होणे किंवा वागण्यात बदल जाणवणे ही तणावाची काही सामन्य लक्षणे आहेत.
अशा वेळी मानसिक ताण कमी केला नाही तर परिस्थिती नैराश्यात जाते. पण, तुम्हाला माहित आहे का की हा ताण 24 तासांत कमी होऊ शकतो. The Sun मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तात, एका न्यूट्रिशनल थेरपिस्टने काही टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्सविषयी समजनून घेऊयात.
योग्य आहार महत्वाचा
तणावामुळे, न खाणे आणि साखरयुक्त पदार्थ खाण्याची सवय ही सामान्य बाब आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, तुम्ही साखरयुक्त पेय आणि स्नॅक्सकडे दुर्लक्ष करा आणि कार्बोहायड्रेट असलेल्या अन्नाचं सेवन करा. चांगले अन्न खाल्ल्याने तुमचे हृदय आणि मन दोन्ही निरोगी राहते.
व्यायामाची सवय लावा
तणावाखाली असल्याने लोक व्यायाम किंवा इतर शारीरिक हालचाली टाळतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शारीरिक व्यायाम केल्याने तुमचे मन तणावापासून दूर होण्यास मदत होते. चालणे, जॉगिंग, पोहणे किंवा योगासने आपल्याला तणावापासून वाचवू शकतात.
पचनाची काळजी घ्या
मद्यपान करणे किंवा जास्त साखरेचे पदार्थ खाणे ही सवय जर तुम्हाला असेल तर ती वेळीच बदलायला हवी कारण याचा पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. अनेक आजार पोटापासून सुरू होतात, त्यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य चांगले ठेवा.
स्विच ऑफ मोडमध्ये जा
जेव्हा आपण काळजीत असतो किंवा तणावाखाली असतो तेव्हा आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करणे कठीण होते. तुम्हाला दिवसातून फक्त 10 मिनिटांसाठी स्विच ऑफ मोडमध्ये यावे लागेल. अशा वेळी सर्वकाही दूर ठेवा आणि डोळे बंद करा. तसेच, सकारात्मक गोष्टींबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करा.
चांगली झोप घ्या
चांगली झोप घेणं हा कोणत्याही मानसिक आजारावर रामबाण उपाय आहे. संशोधनात असेही समोर आले आहे की, जे लोक 8 तास झोप घेतात त्यांना तणावाची समस्या कमी होते. यासाठी रात्री उशिरा जेवू नका कारण यामुळे तुम्हाला वेळेवर झोप येत नाही. याशिवाय फोन किंवा इतर स्क्रीनचा अतिवापर टाळा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.