Maghi Ekadashi 2022 : माघी एकादशी म्हणजे काय आणि त्याचे महत्व जाणून घ्या...
Maghi Ekadashi 2022 : माघी एकादशी या दिनाला हिंदू धर्मात फार महत्वाचे स्थान आहे.
Maghi Ekadashi 2022 : या दिनाला हिंदू धर्मात फार महत्वाचे स्थान आहे. या दिवशी पंढरपुरात विठुरायची महापूजा केली जाते. विठुरायाचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात येते. या दिवशी पंढरपुरात विठुरायाचे दर्शन करण्यासाठी भाविकांची गर्दी जमलेली असते. मात्र, देशात आणि जगात कोरोनाचे सावट पसरल्याने भाविकांना यंदाही यात्रेचा अनुभव घेता येणार नाही.
दरवर्षी पंढरपुरात माघी एकादशीला आनंदोत्सव असतो. या दिवशी विठुरायाचे मंदिर वेगवेगळ्या फुलांनी सजविण्यात येते. महापूजा केली जाते. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आजच्या माघ शुद्ध दशमीलाही अनन्यसाधारण महत्व असून याच दिवशी जगतगुरु तुकाराम महाराजांना उपदेश झाला होता म्हणून येणारा प्रत्येक वारकरी चंद्रभागा आणि विठुरायाचे दर्शन घेत असतो. तर उद्याची म्हणजेच (12 फेब्रुवारी 2022 रोजी) शनिवारी माघी एकादशी ही इंद्रियांवर विजय मिळवून विठुरायाचे दर्शन घेण्याचा योग अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे.
माघी एकादशी म्हणजे काय?
एक दशा म्हणजेच एकादशी होय. सर्व इंद्रियांचा एकच विषय असणे याला एकादशी म्हटले जाते. 'ऐका पंढरीचे महिमान राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण ते ही देव जाणावे' हा भाव प्रत्येक भाविकांच्या मनामध्ये असतो. म्हणूनच पंढरीमध्ये पोहोचल्यानंतर वारी पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येक भाविकाला प्राप्त होते.
आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्र महिन्यात माघी एकादशी साजरी केली जाते. पंढरपुरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून एकही वारी झाली नाही. या दरम्यान, जवळपास सहा वाऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यंदाची माघी एकादशीही भाविकांविना साजरी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
Important Days in February 2022 : फेब्रुवारी महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha