Kitchen Tips : उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक अजिबात करु नका; परिणाम जाणून घ्या...
Kitchen Tips : बटाट्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी, अनेकजण उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवतात. पण, ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे.
Kitchen Tips : उकडलेले बटाटे (Boiled Potatoes) जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरांत वापरले जातात. कारण बटाटे (Potato) हे शाकाहारी (Veg) आणि मांसाहारी (Non-Veg) अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांबरोबर अगदी सहज वापरता येतात. पण जेव्हा बटाट्याच्या स्टोरेजचा प्रश्न येतो तेव्हा बहुतेक लोक काही चुका करतात. तुम्हीही एकाच वेळी अनेक बटाटे उकळून फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बटाट्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी, अनेकजण उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवतात. पण, ही एक अतिशय चुकीची आणि नुकसानकारक पद्धत आहे. कारण येथे आम्ही तुम्हाला उकडलेले बटाटे साठवण्याची योग्य पद्धत आणि ते फ्रिजमध्ये साठवून ठेवण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती या संदर्भात सविस्तर माहिती सांगणार आहोत.
टेक्चर खराब होते
तुम्ही जर उकडलेले बटाटे अधिक काळ टिकावेत यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवत असाल तर तुमचा हा मोठा गैरसमज आहे. फ्रिजमध्ये बटाटे टिकत नाहीत तर ते खराब होतात. यामुळे बटाट्याचं टेक्चर बिघडते. त्यामुळे बटाटे फ्रिजमध्ये ठेवू नका.
बटाट्याची चव विचित्र लागते
तुम्ही जर फ्रिजमध्ये ठेवलेल्या बटाट्यांची चव घेतली तर तुमच्या लक्षात येईल की यामुळे बटाट्याची मूळ चव नष्ट होते. थंडीमुळे ते मऊ होतात आणि त्यांची चवही विचित्र लागते.
आरोग्यासाठी नुकसानकारक
उकडलेले बटाटे थंड करून पुन्हा गरम केल्याने ऍक्रिलामाईडची पातळी वाढते. त्यामुळे ते आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतात. याशिवाय, फ्रीजमध्ये ठेवल्याने बटाट्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात. यासाठी बटाटे फ्रिजमध्ये ठेवू नयेत.
उकडलेले बटाटे स्टोर करून ठेवण्याचा योग्य मार्ग
सर्वात आधी, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, बटाट्यांची जेवढी आपल्याला आवश्यकता असेल तेवढेच ते उकळावेत. आणि जरी उकडलेले बटाटे चुकून उरले तरी ते सामान्य खोलीच्या तापमानावर (Normal Room Tempreture) ठेवा. तसेच एका मोठ्या भांड्यात पसरवून साल न काढता ठेवा. यामुळे बटाटे अधिक काळ टिकून राहतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :