July 2024 Holiday : जुलैमध्ये लाँग वीकेंडचा No Chance! तर साप्ताहिक सुट्ट्या किती? सुट्टीचे कॅलेंडर जाणून घ्या
July 2024 Holiday : बऱ्याच लोकांनी घरातील, कार्यालयातील कॅलेंडरचे पान बदलले असेल, तर काहींचे घाई-गडबडीत राहिले असेल, पण ही बातमी वाचल्यानतंर तुम्हाला सविस्तरपणे लक्षात येईल.
July 2024 Holiday : नवीन महिना सुरू झाला की अनेकांना उत्सुकता असते, ती म्हणजे त्या महिन्यात किती सुट्ट्या असतील. लहान मुलं असोत किंवा मोठे, प्रत्येकजण सुट्टीची वाट पाहत असतो. अशात आता वर्ष 2024 मधील सातवा महिना जुलै सुरू झाला आहे. बऱ्याच लोकांनी घरातील, कार्यालयातील कॅलेंडरचे पान बदलले असेल, तर काहींचे घाई-गडबडीत राहिले असेल, पण ही बातमी वाचल्यानतंर तुम्हाला सविस्तरपणे लक्षात येईल. जाणून घ्या जुलैमध्ये किती साप्ताहिक सुट्ट्या असतील? आठवड्याला लाँग वीकेंड कसा बनवू शकता ते जाणून घ्या...
जुलै 2024 मध्ये लाँग वीकेंड, विशेष सुट्टी आहे का?
शाळकरी मुलांनीही या महिन्याच्या सुट्टीच्या कॅलेंडरवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. कारण उन्हाळ्याच्या एका मोठ्या सुट्टीनंतर शालेय जीवनाशी जुळवून घेणे सोपे नसते. पण या महिन्यातील सुट्ट्या पाहता जुलैमध्ये साप्ताहिक सुट्ट्या (शनिवार किंवा रविवार) वगळता एक विशेष सुट्टी आहे, म्हणजेच या महिन्यात फक्त तुम्हाला आषाढी एकादशी आणि मोहरमची सुट्टी मिळेल. पण हे दोन्ही सण एकाच दिवशी असल्याने एकच दिवसाची सुट्टी मिळेल, इतकेच नाही तर जुलै 2024 मध्ये कोणताही लाँग वीकेंड नाही. शाळा-महाविद्यालयात जाणारी मुले किंवा व्यावसायिकांची इच्छा असल्यास ते काही तडजोडी करून लाँग वीकेंड साजरा करू शकतात.
जुलैमध्ये किती शनिवार, रविवार?
काही शाळा आणि महाविद्यालये शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी बंद असतात. त्याचबरोबर काही ठिकाणी रविवारीच सुट्टी असते. जुलै 2024 मध्ये 4 शनिवार आणि 4 रविवार असतील. काही शाळांमध्ये शनिवारी अर्धा दिवस असतो तर काही शाळांमध्ये शेवटच्या शनिवारी सुट्टी असते.
जुलैमध्ये आषाढी एकादशी आणि मोहरम एकाच दिवशी
यंदाच्या जुलै महिन्यात आधीच सुट्ट्यांचा तुटवडा असल्याने लॉंग विकेंडची संधी दिसत नाही, यामुळे अनेकांचा विशेषत: बच्चे कंपनीचा हिरमोड झाला आहे. अशात आता जुलै महिन्यातील कॅलेंडर पाहता 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आणि मोहरम एकाच दिवशी असल्याने एक सुट्टीची कमतरता भासणार आहे. त्यामुळे या महिन्यात ट्रीपचा प्लॅन करत असाल तर तूर्तास तरी ब्रेक घेतला तरी चालेल किंवा अधिकृतपणे सुट्टी घेऊन तुम्ही सहलीला जाऊ शकता.
जुलै 2024 सुट्ट्यांचे कॅलेंडर जाणून घ्या..
7 जुलै : पहिला रविवार
13 जुलै : पहिला शनिवार
14 जुलै : दुसरा रविवार
17 जुलै : बुधवार, आषाढी एकादशी, मोहरम
21 जुलै: तिसरा रविवार गुरुपौर्णिमा
27 जुलै : चौथा शनिवार
28 जुलै : चौथा रविवार
हेही वाचा>>>
Health : ऑफिसच्या कामामुळे वैयक्तिक आयुष्यावर होतोय परिणाम? तणाव वाढतोय? 'या' टिप्सने मानसिक आरोग्य सुधारण्यास मिळेल मदत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )