Yoga For Women : महिलांनी दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. आजही भारतातील बहुतांश स्त्रिया केवळ घरातील कामांमध्येच व्यस्त असतात. त्या स्वत:साठी स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ देत नाहीत. अशा परिस्थितीत स्त्रियांना पाय दुखणे, गुडघेदुखी, पाठदुखी आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कुटुंबाची काळजी घेताना महिला स्वतःची काळजी घेणे मात्र विसरतात. त्यामुळे त्यांचे वय लवकर दिसू लागते. अनेक वेळा महिलांना जिममध्ये जाण्यासाठी किंवा इतर व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा स्थितीत योगाद्वारे तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. योगामुळे तुम्ही केवळ निरोगीच राहत नाही, तर योग तुम्हाला दीर्घकाळ निरोगी आणि तरुण ठेवण्यास मदत करतो. महिलांनी तिशीनंतर हे योग नक्की करावे.


महिलांसाठी योगासने :


1. चक्रासन : चक्रासन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह चांगला राहतो. तणाव कमी होतो आणि डोळे निरोगी राहतात. असे केल्याने दिवसभराचा थकवा निघून जातो. महिलांनी हे आसन अवश्य करावे. 


चक्रासन कसे करावे?


चक्रासन करण्यासाठी पाठीवर झोपा आणि पाय वाकवा, पाय जमिनीवर ठेवा आणि तळवे उलटे करा आणि कानाजवळ ठेवा. श्वास घेताना, आधारासाठी तुमचे तळवे आणि पाय जमिनीवर दाबा, तुमचे हात आणि पाय सरळ करा आणि श्रोणि वर उचला. कमान तयार करण्यासाठी आपले संपूर्ण शरीर हळू हळू वर करा. आता हळूहळू डोके मागे ठेवा आणि मान शिथिल करा.


2. हलासन : ज्या महिलांना पाठ, पाय आणि पोटाच्या समस्येने त्रास होत असेल त्यांनी हलासन अवश्य करावे. यामुळे पाठीच्या स्नायूंना आणि पाठीच्या कण्याला ताकद मिळते. रक्ताभिसरण सुधारते आणि पचनासाठी फायदेशीर सिद्ध होते.


हलासन कसे करावे?


पाठीवर जमिनीवर सरळ झोपा. आता दोन्ही हात मांड्याजवळ जमिनीवर ठेवा. श्वास घेताना हळूहळू दोन्ही पाय सरळ वर करा. हात खाली दाबून कंबर वाकवून पाय डोक्याच्या मागे ठेवा. 2-3 मिनिटांनंतर आपले डोके न उचलता, हळूहळू सामान्य स्थितीत या.


3. अंजनेयासन : वजन कमी करण्यासाठी अंजनेयासन करा. या आसनामुळे पचनक्रिया सुधारेल आणि रक्ताभिसरण अधिक चांगले होईल. दररोज असे केल्याने तणाव कमी होईल आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. 


अंजनेयासन कसे करावे?


हे आसन करण्यासाठी वज्रासनाच्या आसनात बसावे. आता तुमचा डावा पाय मागे घ्या आणि उजव्या पायाचा तळ जमिनीवर ठेवा. दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या आणि त्यांना एकत्र करा. हळू हळू मागे झुकण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान, शक्य तितक्या मागे हात हलवा. थोडा वेळ असेच राहा आणि जुन्या स्थितीत परत या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :