International Yoga Day 2022 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. त्यानुसार दरवर्षी 21 जून या दिवशी 'जागतिक योग दिन' साजरा केला जातो. 


योगा केल्याने शरीर आणि मन स्थिर राहते. तसेच, सकारात्मक ऊर्जा मिळते हे तर आपण सगळ्यांनी ऐकले आहे. पण त्याचबरोबर योगा केल्याने शरीराला इतर कोणते फायदे मिळतात हे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 


योगाचे 10 फायदे : 


1. योगामुळे तुमची ऊर्जा वाढते. तसेच, तुमच्या हाडांत लवचिकता येते. 


2. योगामुळे तुमच्या पाठीच्या दुखण्यावर आराम मिळतो. एका संशोधनानुसार, असे सिद्ध झाले आहे की, पाठीच्या दुखण्यावर सर्वात रामबाण उपाय म्हणजे नेहमी योगा करणे. 


3. योगामुळे तणावाची पातळी कमी होते. तसेच, तुम्हाला हृदयासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. जसे की, छातीत दुखणे, उच्च रक्तदाब इ. 


4. योगामुळे तुम्हाला उत्तम झोप लागते. 


5. योगामुळे तुमचा मूड चांगला राहतो. दिवसभर तुम्ही ताजेतवाने राहता. 


6. योगामुळे तुम्ही तणावावर नियंत्रण ठेवू शकता. अतिरिक्त विचार येण्यापासून स्वत:ला थांबवू शकता. तसेच, नकारात्मक विचार येत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवू शकता. 


7. योगा तुमची शारिरीक तसेच मानसिक क्षमता वाढविण्यास मदत करतात. 


8. योगामुळे तुमची चिंता (Anxiety) कमी करता येते. 


9. नियमित योगासने केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते. 


10. योगामुळे तुमची पचनक्रियाही सुधारते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :