Yoga Day 2022 : स्पॉन्डिलायसिस हा एक आजार आहे. ज्यामुळे पाठीच्या, मानेच्या मणक्याचे हाड, कार्टलेज आणि डिस्कवर परिणाम होतो. वयोमानाने मानेची इजा किंवा अपघातात झटका, चुकीच्या स्थितीमुळे मणक्याच्या हाडांचे कुशन असलेल्या पाठीच्या कण्याच्या उती खंडित होतात. त्यामुळे हाडांची झिज होते, कडकपणा येतो म्हणजेच ऑस्टियोआर्थ्रायटिस, त्याचाच परिणाम मान आणि कंबर दुखणे, वाकताना वेदना होणे, मान दुखणे, डोक्याच्या मागच्या बाजूस दुखणे, हाताला मुंग्या येणे अशी लक्षणं आढळतात.     


मानेचा Spondylosis असलेल्यांना प्रवासात मानेला झटके बसतात तसेच मान दुखू लागते. काहींना कमरेचा त्रास असतो. शरीर एकाच अवस्थेत राहून आखडून जाते. जसे झोपेतून उठल्यानंतर नियमित व्यायामाची गरज असते. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम असल्या कारणाने एकाच ठिकाणी सलग 8 ते 9 तास काम करून अनेकांना स्पॉन्डिलायसिसचा त्रास सुरु झाला. यामध्ये शरीराची हालचाल न केल्याने तसेच व्यायाम न केल्याने हाडांमध्ये कडकपणा येऊन लवचिकता निघून जाते.    


स्पॉन्डिलायसिससाठी योगाभ्यास हा एक नैसर्गिक मार्ग आहे. योगाभ्यासाने शरीर लवचिक होते, तसेच मन शांत होते आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त होतो. तुम्हाला डॉक्टरांच्या गोळ्या आणि नैराश्य यापासून जर सुटका मिळवायची असेल तर यासाठी तुम्हाला नियमित योगासन करावे लागेल. योगासनामुळे तुम्ही स्पॉन्डिलायसिस सारख्या गंभीर आजारावरही मात मिळवू शकता. दरवर्षी 21 जून हा 'जागतिक योग दिन' (International Yoga Day 2022) म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा खास लेख.   


या संदर्भात (होमिएओपथिक फिजिशियन, योगा थेरपिस्ट) डॉ. सौ. अंजली बाळकृष्ण उमर्जिकर यांनी स्पॉन्डिलायसिस सारख्या आजाराने त्रासलेल्या लोकांसाठी काही आसनं सांगितली आहेत. ही आसनं कोणती ते जाणून घेऊयात. 


योग्य मार्गदर्शनाने स्पॉन्डिलायसिसने त्रासलेल्या लोकांनी 'ही' आसने करावीत 

1. अर्ध्मत्स्येन्द्रासन : या आसनाने मान आणि खांद्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि पाठीच्या कणामध्ये ऊर्जा निर्माण होते.





2. धनुरासना : या आसनामुळे कण्याचा कडकपणा घालवण्यास मदत होते. तसेच हे आसन कमरेच्या आणि मानेच्या भागाला कार्यरत बनवते.   





3. सेतुबन्धासना : या आसनाने मान आणि पाठीच्या कणामध्ये तणाव निर्माण करतो. पाठीचा कणा लवचिक बनतो आणि पाठ दुखी कमी होण्यास मदत होते.





महत्वाच्या बातम्या :