Yoga Day 2022 :  अनेकांचा स्वभाव चिडचिडा असतो. काही जणांचे रागावर नियंत्रण राहात नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड केल्यानं आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही योगासनं करु शकता. रागाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी दररोज योगासनं करावी. योगासने केवळ तुमचे मन शांत आणि स्थिर ठेवण्यास मदत करत नाहीत तर ते तुमच्यासाठी रागाची भावना कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही योगासनं करा-


बालासन/चाइल्ड पोज
दररोज बालासन केल्यानं मन शांत राहतं. तसेच बलासनामुळे भावना नियंत्रणात ठेवता येतात. नकारात्मकत भावना देखील तुमच्यामध्ये निर्माण होणार नाहीत. नियमितपणे हे आसन केल्यानं तुम्हाला   रागावर नियंत्रण मिळवता येईल. पाठीच्या आणि पोटाच्या स्नायूंसाठीही हे आसन खूप फायदेशीर आहे.


असे करा बालासन
1.वज्रासनात योगा मॅटवर बसा.
2.हळू श्वास घ्या आणि हात डोक्याच्या वरच्या बाजूला वर न्या.
3.हळूहळू श्वास सोडा आणि पुढे वाकून कपाळ जमिनीवर ठेवा.
4.हे करताना श्वासावर लक्ष केंद्रीत करा.
5. हे 30 सेकंद करा, त्यानंतर शरीराला विश्रांती द्या.



मत्स्यासन
मत्स्यासन केल्यानं तुमच्या रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते तसेच तणाव कमी होतो. त्यामुळे चिडचिड देखील कमी होते. 


असे करा मत्स्यासन
मत्स्यासन करण्यासाठी प्रथम पद्मासनामध्ये बसा. त्यानंतर पाठीवर झोपा. त्यानंतर मस्तक आणि धड हे वाकवा. ज्यामुळे पाठीची कमान होईल. पाठिची कमाई तशीच ठेवून पायांचे अंगठे पकडा. 


योगा-डे ची यंदाची थिम


मन की बात या कार्यक्रमाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा-डेची यंदाची थिम सांगितली. ते म्हणाले, "21 जून रोजी आपण 8वा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करणार आहोत. या 'योग दिवसाची संकल्पना (Theme) आहे - “मानवतेसाठी योग”. मी तुम्हा सर्वांना 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करतो. तुम्हीही 'योग दिना'ची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असे मला वाटते. अधिकाधिक लोकांना भेटा, सर्वांना 'योग दिना'च्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करा, प्रेरणा द्या."


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हेही वाचा:


International Yoga Day 2022 : योग म्हणजे काय? जाणून घ्या योगाचे फायदे आणि प्रकार