Time Mnagement Tips : वेळेचे नियोजन कसे करावे? वेळेच्या योग्य नियोजनाकरता फाॅलो करा 'या' टिप्स
बऱ्याचदा लोक तक्रार करतात की, त्यांची कामं एका दिवसात पूर्ण होत नाहीत.अशा वेळी या काही टिप्स फाॅलो करा.
Time Management Tips : अनेक लोकांसाठी दिवसातील 24 तास कमी पडतात. त्यांचे खूप कामं पूर्ण होत नाही, मग ते घरचे असो वा ऑफिसचे. तुमच्या सोबतही असे घडत असेल तर याचे कारण आहे तुम्ही योग्य वेळेचे नियोजन करत नाहीत.तुम्ही वेळेचा योग्य वापक केला नाही तर तुमचे एकही काम तुम्हाला हवे असणाऱ्या वेळेत पूर्ण होणार नाही.
- जेव्हा तुम्हाला वेळेचे महत्त्व कळेल, तेव्हा वेळ वाया घालवणे थांबवा आणि तुमचे ध्येय पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करा.
- तुमचे वेळेचे नियोजन (Time Management) चांगले असेल तर कमी वेळेत जास्त काम करता येते. अशा प्रकारे तुम्हाला आनंद घेण्यासाठी देखील पूर्ण वेळ मिळेल. प्रत्येक कामासाठी एक वेळ निश्चित करा आणि त्याप्रमाणे करा.
- प्रत्येक कामासाठी वेळ ठरवून दिल्यावर अडचणीही येत नाहीत.
- वेळेच्या योग्य नियोजनामुळे तुमचे काम लवकर पूर्ण होते आणि तुम्हाला स्वतःसाठी अधिक मोकळा वेळ मिळतो.
- जर तुम्ही वेळेचे नियोजन शिकलात तर तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतो.
- जेव्हा तुम्ही तुमच्या कामांची आधीच वेळेच्या आधी योजना करता, तेव्हा तुम्ही नक्कीच चांगले निर्णय घेऊ शकाल आणि तुमचे काम अधिक चांगले होऊ शकेल.
- जेव्हा तुमच्याकडे बरीच कामे असतात पण कोणते काम, कुठे आणि कसे करावे हे माहित नसते तेव्हा तणाव आणि चिंता वाढते. कामांची यादी तयार केल्यास आणि आपल्या कामांना प्राधान्य दिल्यास आणि ते वेळेवर पूर्ण करण्याची योजना तयार केल्यास सर्व काम लगेच होतात.
- तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
- तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा.
- प्रत्येक काम आजच पूर्ण करण्याची सवय लावा.
- रोजच्या जीवनात मोबाईलचा वापर करणे कमी करा. कामाव्यतिरीक्त मोबाईल वापरू नका.
- एका कार्यानंतर लगेच दुसरे कार्य करू नका. स्वतःला काही वेळ विश्रांतीसाठी द्या आणि पुढील कार्य अधिक प्रेरणा घेऊन सुरू करा.
- आपला दिवस थोडा लवकर सुरू करणे नेहमीच चांगले असते जेणेकरून आपल्याकडे सर्व प्रकारच्या कामांकरता योग्य वेळ असेल. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या झोपेमध्ये तडजोड केली पाहिजे. आपल्यासाठी दररोज 7-8 तास झोप घेणे महत्वाचे आहे.
इतर महत्वाच्या बातम्या