Suicidal Thoughts : एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार आहेत हे कसे ओळखाल? जाणून घ्या ही काही लक्षणे आणि त्यावरील उपाय
आजकाल जगभरात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक माणूस आज कोणत्या ना कोणत्या कारणाने हतबल झालेला आहे. अशा वेळी अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो.
Suicidal Thoughts : आजकाल जगभरात आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक माणूस आज कोणत्या ना कोणत्या कारणाने हतबल झालेला आहे. अशा वेळी अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो आणि ही लोकं काहीतरी चुकीचे पाऊल उचलतात. जगभरात दरवर्षी आठ लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात तर त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. आत्महत्या करण्याचा विचार येणं हे खरेतर शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक आजाराचे लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनात जर सारखेच आत्महत्येचे विचार येत असतील तर त्याला Suicidal ideations म्हणले जाते. मात्र हे विचार येण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि यावरील उपाय काय हे जाणून घेऊयात.
एखाद्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याची लक्षण कोणती आहेत ?
- सतत मृत्यूचा विचार करणे. आपण कोणत्या पद्धतीने आत्महत्या करू शकतो याचा विचार करत राहणं.
- मित्र-मैत्रिणी , कुटुंब यांच्यापासून सतत वेगळ राहणं.
- अचानकच वागण्यात बदल होणे.
- मरण्याविषयी बोलणे , लिहिणे तसेच सारखा तोच विचार करणे.
- कायम अस्वस्थ वाटत राहणे
- इतरांवर चिडचिड करणे
- सततच्या चुकीच्या वागण्यामुळे दारू आणि ड्रगचे प्रमाण वाढते.
- ज्या गोष्टीत आनंद वाटत होता, आता त्या गोष्टीत रस नसणं.
- भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना.
- छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे
- सर्वांमध्ये असूनही आपण त्यांच्यामध्ये नाही असे वाटणे
हे उपाय करा
- व्यायाम, योग, सकस जेवण
- नात्यांमध्ये सुसंवाद असावा
- एकमेकांच्या भावना समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा
- किमान तीन-चार मित्र/मैत्रिणी असे असावेत, की ज्यांच्याजवळ मनातील भावना व्यक्त करता येतील
- आवडत्या व्यक्तीची भेट घ्यावी
- स्वतःला वेळ द्या, स्वतःशी बोला
- दिवसातून थोडा वेळ स्वतःसोबत घालवा
- आपण नक्की काय करतो, कसे वागतो, का वागतो, आपली ध्येय, स्वप्ने, आपली संगत यांचा विचार करा
आत्महत्येच्या विचारातून बाहेर येण्यासाठी सुसाइड हेल्पलाईनची मदत, समुपदेशन, सकारात्मक विचार आणि वैद्यकीय मदत हे मार्ग आहेत. तर गंभीर प्रकरणात इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह (ECT) थेरपी अत्यंत उपयुक्त आहे. औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने आत्महत्येचे विचार मनातून जाऊ शकतात. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
इतर महत्वाच्या बाातम्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )