Hip Pain in Winter : हिवाळ्यात बसताना किंवा चालताना त्रास होत असेल तर या 'सायलेंट किलर' आजाराचे लक्षण असण्याचा धोका; वेळीच सावध व्हा, अन्यथा...
Hip Pain in Winter : कोलेस्टेरॉल वाढल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होतो. यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
![Hip Pain in Winter : हिवाळ्यात बसताना किंवा चालताना त्रास होत असेल तर या 'सायलेंट किलर' आजाराचे लक्षण असण्याचा धोका; वेळीच सावध व्हा, अन्यथा... Hip Pain in Winter can be reason of these disease marathi news Hip Pain in Winter : हिवाळ्यात बसताना किंवा चालताना त्रास होत असेल तर या 'सायलेंट किलर' आजाराचे लक्षण असण्याचा धोका; वेळीच सावध व्हा, अन्यथा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/30/3d35e9f694665bafa0201cb3079a04091669806509238358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hip Pain in Winter : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आजारांनी घेरले आहे. एकेकाळी ब्लड प्रेशर (BP), कोलेस्ट्रॉल (Cholesterol) यांसारखे आजार फार गंभीर मानले जायचे. तिथे आता हेच आजार लोकांमध्ये खूप सामान्य झाले आहेत. त्यामुळे आज लोक गंभीर हृदयविकाराने त्रस्त आहेत. उच्च कोलेस्टेरॉल हे देखील या आजारांच्या वाढीचे कारण आहे. वाढत्या कोलेस्ट्रॉलचा थेट परिणाम तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर होतो. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. ही पातळी नियंत्रित करणे खूप कठीण होते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका लक्षणाबद्दल सांगणार आहोत ज्याचा थेट संबंध कोलेस्ट्रॉलशी आहे. चला तर मग जाणून घेऊयात.
दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात
मानवी शरीरात दोन कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे वाईट कोलेस्ट्रॉल. शरीरात त्यांच्या वाढीची लक्षणे खूप शांत असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलला 'सायलेंट किलर' म्हणतात. थंडीच्या ऋतूत कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने अनेक आजार होतात, ज्यामध्ये उठण्या बसण्यात एक प्रकारची वेदना होते हे एक प्रकारचे मोठे लक्षण आहे. या आजारादरम्यान उठण्यास बसण्यास खूप वेदना होतात.
उच्च कोलेस्ट्रॉलचा हिप स्नायूंवर परिणाम होतो
उच्च कोलेस्ट्रॉल शरीरात चरबीच्या स्वरूपात असते आणि जेव्हा ते वाढते तेव्हा त्याचा शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. शरीराची प्रणाली अशा प्रकारे तयार केली जाते की रक्त शरीरातील ऑक्सिजनमध्ये मिसळते आणि जेव्हा ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचत नाही तेव्हा वेदना होऊ लागतात. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीरात वेदना वाढतात असे तज्ञ सांगतात.
वेदनांकडे दुर्लक्ष करू नका
सहसा लोक अशा वेदनांकडे दुर्लक्ष करतात. परंतु, त्यांना गांभीर्याने घेणे फार महत्वाचे आहे. तुमचे नितंब शरीराच्या इतर भागांसारखे नाहीत. त्यांची रचना वेगळी आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये उद्भवणाऱ्या वेदना देखील संधिवात सारख्या समस्यांचे कारण असू शकतात.
'ही' आहेत उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणं
थोडी शारीरिक हालचाल केल्यावर जर तुम्हाला तुमच्या कूल्ह्यांमध्ये वेदना होत असतील तर हे उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष करू नका, हे छोटे दुखणे नंतर मोठा आजार बनू शकते, त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Knee Pain Remedies: हिवाळ्यात जाणवते गुडघेदुखीची समस्या? फॉलो करा या सोप्या टिप्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)