Health Tips : आपल्याला उचकी का लागते? उचकी थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा
Health Tips : उचकी ही तुमच्या स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा उचकी लागते.
Health Tips : जेव्हा कधी आपल्याला उचकी (Hiccups) येते तेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपली आठवण काढतंय. पण हीच जर उचकी जास्त किंवा वारंवार येत राहिली तर खूप चिडचिड होते. खरंतर, उचकी येणं हे अगदी सामान्य लक्षण आहे. पण जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर मात्र, काळजी करण्याचं कारण आहे. उचकी येण्याची नेमकी कारणं कोणती आणि ते थांबवण्याचे उपाय नेमके कोणते आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
असे म्हणतात की, घशाच्या नालिकेमधून उचकी येते. उचकी ही तुमच्या स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा उचकी लागते. पण, काही काळानंतर या उचक्या थांबतात. याशिवाय मसालेदार अन्न हे देखील उचकीचे कारण मानले जाते.
अनेकांना तणावात असताना किंवा खूप उत्साहात असताना अथवा भरपूर जेवण जेवले तरी देखील उचकी येऊ लागते. तथापि, आपल्याला याबद्दल जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. काही वेळात ती स्वतःच थांबते. पण, काही वेळा जास्त समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
उचकी कशामुळे होऊ शकते?
- जास्त मद्यपान आणि धूम्रपान केल्याने उचकी येऊ शकते.
- अस्वस्थता हे एक कारण आहे.
- जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अति ताण घेतला तर उचकी येऊ शकते.
- काहीवेळा तुम्ही अतिउत्साहीत असलात तरी उचकी येऊ शकते.
- हवेच्या तापमानातील बदलांमुळे देखील उचकी येऊ शकते
- अन्न चघळल्याशिवाय खाल्ल्यानेही उचकी येऊ शकते.
- जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उचकी येऊ शकते.
- अपचनामुळे देखील उचकी येऊ शकते.
उचकी थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा
- उचकी थांबवण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात काही पुदिन्याची पाने, लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ घाला. हे पाणी प्यायल्याने गॅसपासून आराम मिळेल आणि उचकी देखील दूर होतील.
- एक चतुर्थांश हिंग पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा बटर मिसळून खावे. हे खाल्ल्याने हिचकी थांबते
- सुंठ आणि मायरोबलन पावडर एकत्र करून एक चमचा पावडर पाण्याबरोबर घेतलयास आराम मिळेल.
- वेलचीचे पाणी देखील उचकी थांबवण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी 2 वेलची पाण्यात उकळा आणि ते पाणी प्या
- मध खाल्ल्यानेही उचकीवर नियंत्रण ठेवता येते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :