XE Covid Variant : कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. आजकाल कोरोनाचे नवीन प्रकार XE ची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. लोक याकडे कोरोनाची चौथी लाट म्हणून पाहत आहेत. या प्रकरणात, आपण खूप सावध असणे आवश्यक आहे. मात्र, आता लोकांना कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलची माहिती झाली आहे. जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम 60 वर्षांवरील लोकांवर आणि कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांवर झाला होता, परंतु आता कोविडची सर्वाधिक प्रकरणे लहान मुलांमध्ये समोर येत आहेत. चौथी लाट मुलांसाठी घातक असल्याचे म्हटले जाते. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर अनेक मुलांमध्ये कोविडची लक्षणे दिसत असल्याने, पालक आता किमान लसीकरण होईपर्यंत रिमोट लर्निंग मोडवर आग्रह धरत आहेत. माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमधील 107 नवीन कोविड -19 प्रकरणांपैकी 30% पेक्षा जास्त प्रकरणे मुलांमध्ये नोंदवले गेले आहेत. तसेच, दिल्लीतील अनेक मुलांनाही विषाणूची लागण झाली आहे. यावर तज्ज्ञांनी असे सुचवले आहे की, घाबरण्याची गरज नाही परंतु सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.


लहान मुलांमध्ये XE व्हेरिएंटची लक्षणे
देशात सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट झाली आहे. दररोज देशात एक हजारांहून कमी प्रकरणं नोंदवली जात आहेत. त्यानंतर दोन वर्षांनंतर देशातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध संपले आहेत. तरीही फेस मास्क वापरणं आवश्यक आहे. कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येत कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. दरम्यान, लहान मुलांचा एक मोठा वर्ग अद्याप लसीकरण झाले नसल्यामुळे, त्यांना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे. "लहान मुलांमधील लक्षणे साधारणपणे सौम्य असतात आणि त्यात ताप, नाक वाहणे, घसा दुखणे, अंगदुखी आणि कोरडा खोकला यांसारख्या वरच्या श्वसनमार्गाच्या लक्षणांचा समावेश होतो," असे डॉ. अवी कुमार, वरिष्ठ सल्लागार, पल्मोनोलॉजी,यांनी एका खासगी वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटले आहे.


चांगले पोषण आणि निरोगी जीवनशैलीची गरज
तज्ज्ञांनी निदर्शनास आणले आहे की, पालकांनी त्यांच्या मुलांना निरोगी जीवनशैली, वेळेवर खाणे-झोपणे, स्वच्छता पद्धतींचे पालन करणे, तसेच लसीकरणास पात्र असलेल्या मुलांनी ते लवकरात लवकर घ्यावे याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी चांगले पोषण आणि निरोगी जीवनशैली देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. घरामध्ये तसेच शाळेच्या आवारात प्राथमिक स्वच्छतेची काळजी देखील घेतली पाहिजे, ज्यात स्वच्छता आणि हात धुण्याच्या पद्धतींचा समावेश आहे. "हे ओमिक्रॉनचेच उत्परिवर्तन असल्याने, लसीमुळे नवीन प्रकारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लसीसाठी पात्र असलेल्या मुलांनी त्यांची लस घेतले पाहिजे, कारण ते या संसर्गाच्या गंभीर स्वरूपापासून संरक्षण करेल," "डॉ गुरलीन सिक्का, नवजातशास्त्र विभाग बालरोग यांनी हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्राला सांगितले.


घाबरण्याचे कारण नाही - बालरोगतज्ञ
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी पीटीआयला सांगितले की, "घाबरण्याची गरज नाही, कारण भूतकाळातील लहरींच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून आले आहे की, मुलांना जरी कोविड-19 ची लागण झाली असली तरी, त्यांना सौम्य आजार आहे, ते केवळ लक्षणात्मक उपचाराने बरे देखील होतात." त्यामुळे पात्र मुलांनी ही लस घ्यावी. परंतु ज्यांनी लसीकरण केलेले नाही त्यांनीही घाबरू नये. कारण त्यांना गंभीर संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी आहे, असे ते म्हणाले.


XE व्हेरियंट कितपत धोकादायक? 


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, नवीन XE प्रकार प्रथम युनायटेड किंगडम (यूके) मध्ये 19 जानेवारी रोजी आढळला आणि तेव्हापासून शेकडो तपासण्या करण्यात आल्या आहेत. हे दोन व्हेरियंट ओमायक्रॉनची इतर रूपं ba.1 आणि ba.2 चं म्यूटेंट हायब्रिड आहे. WHO ने म्हटलं आहे की, नवीन म्यूटेंट Omicron च्या ba.2 सब-व्हेरियंटपेक्षा सुमारे 10 टक्के अधिक संक्रमणक्षम आहे. जे कोणत्याही प्रकारच्या स्ट्रेनपेक्षा जास्त संक्रमणीय असू शकतं. 


कोरोना व्हेरियंटच्या नव्या व्हेरियंटमुळे आरोग्य वर्तुळात चिंता वाढली आहे. कारण महाराष्ट्र सध्या रिकव्हरी ट्रॅकवर आहे आणि डिसेंबर 2021 मध्ये सुरू झालेली राज्यातील तिसरी लाट अंतिम टप्प्यात आहे. जरी सध्या जगभरात XE चे काही रुग्ण आढळून आले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :