Mumbai Coronavirus New Variant : मुंबईत कोरोनाचा XE व्हेरियंट आढळला आहे. बुधवारी मुंबई कोरोनाचा XE व्हेरियंट आढळल्याचं बीएमसीकडून (Mumbai Municipal Corporation) सांगण्यात आले होते. नव्या व्हेरियंटची चर्चा सुरु असताना  WHOच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (WHO Chief Scientist Soumya Swaminathan) यांनी मात्र दिलासा देणारी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, XE व्हेरियंट डेल्टा इतका प्रभावी नाही.  


कोरोनाच्या XE प्रकाराचा भारतात डेल्टासारखा परिणाम होण्याची शक्यता नाही


WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणतात की कोरोनाच्या XE प्रकाराचा भारतात डेल्टासारखा परिणाम होण्याची शक्यता नाही. भारतातील बहुतेक लोकांचं कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. नवीन प्रकारासंबंधीच्या प्राथमिक माहितीच्या आधारे, असे म्हटले जात आहे की ते इतर प्रकारांपेक्षा 10% जास्त संसर्गजन्य आहे. म्हणजेच त्याचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे की,  आम्ही अजूनही XE प्रकाराचा बारकाईने अभ्यास करत आहोत आणि अधिक माहिती घेत आहोत. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या व्हेरियंटला घाबरण्याची गरज नाही. कारण यामुळं रुग्ण जास्त गंभीर  होत नाही. ज्यांचं लसीकरण करण्यात आले आहे त्यांना सुरुवातीची कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत, असं स्वामिनाथन यांनी स्पष्ट केलं आहे. 


मुंबईत एक्सई व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याची माहिती


बुधवारी बीएमसीने मुंबईत एक्सई व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. एक्सई व्हेरीयंट रुग्ण महिला मूळची दक्षिण आफ्रिकन असून वय वर्ष 50, दोन्ही लसीचे डोस पूर्ण सोबतच कोणतीही लक्षणं नव्हती. एक्सई व्हेरीयंट रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून 10 फेब्रुवारी रोजी भारतात आली होती. लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. भारतात आल्यावर रुग्ण निगेटिव्ह होता मात्र दोन मार्च रोजी रुटिन टेस्ट केल्यावर कोव्हिड पॉझिटिव्ह आढळली. अशात रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मार्च रोजी रुग्णाची चाचणी केल्यानंतर रुग्ण निगेटिव्ह आली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या


Coronavirus : धोका वाढतोय? मुंबईत आढळले कोरोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचे रुग्ण  


बीएमसी म्हणतेय, मुंबईत कोरोनाचा XE व्हेरियंट आढळला, पण केंद्राचा नकार