XE Variant of Coronavirus : देशात सध्या कोरोना व्हायरसच्या (Covid-19) रूग्णसंख्येत घट होत आहे. देशातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध आता संपुष्टात आले आहेत. तरीही मास्क वापरणं मात्र आवश्यक आहे. अशातच आता कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. या व्हेरियंटबाबत नुकतीच डॉक्टर रवी गोडसे (DR Ravi Godse) यांनी माहिती दिली असून, या व्हेरियंटला लोकांनी घाबरू नये, असं रवी गोडसे यांनी सांगितलं आहे. 
 
रवी गोडसे म्हणाले, 'काही वेळापूर्वी मी माझ्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये मी XE या नव्या व्हेरियंटबद्दल सांगितलं आहे. हा नवा व्हेरियंट XE हा तुम्हाला भीतीदायक वाटेल, पण त्यामध्ये तथ्य नाही. XE व्हेरियंट हा भारतासाठी घातक नाही. ओमिक्रॉनपेक्षा Ba-2 संसर्गाचे प्रमाण जास्त होते. असं म्हटलं जात होतं की, डेल्टा क्रॉन धोकादायक आणि ऑमिक्रॉनसारखा जलद गतीने पसरणारा आहे. डेल्टा क्रॉन खतरनाक असू शकतो, पण ज्यांना ओमिक्रॉन झाला त्यांना डेल्टा क्रॉनची भिती नाही. आता XE व्हेरियंट कसा आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा काय नवीन म्युटेशन नसून हा जुनाच आहे. याची पहिली केल इंग्लंडमध्ये 19 जानेवारीला आढळली होती. मात्र, आता सगळं चांगलं चालू आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टीला गालबोट लागू नये, म्हणू ही न्यूज देण्यात आली आहे. XE हा व्हेरियंट BA and BA-2 हे दोघांचे कॉम्बिनेशन XEआहे. हा फास्ट म्युटेशन आहे. पण त्याचा भारताला धोका नाही. त्यामुळे घाबरू नका.' 


XE व्हेरियंटची लक्षणं काय? 
यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या मते, XE व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये नाक वाहणं, शिंका येणं आणि घशात खवखव होणं यांसारखी लक्षणं दिसून येतात, जी विषाणूच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगळी आहेत. कारण, मूळ स्ट्रेनमध्ये रुग्णाला ताप आणि खोकला यांसारख्या तक्रारींचा सामना करावा लागतो. तसेच, या व्हेरियंटमध्येही इतर व्हेरियंटप्रमाणे चव लागत नाही. तसेच, कोणताही गंध येत नाही. 22 मार्चपर्यंत इंग्लंडमध्ये एक्सईची लागण झालेले 637 रुग्ण आढळून आले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha