Health Tips : तरूणींमध्ये PCOD चे प्रमाण वाढण्याचं कारण काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार
Women Health Problems : PCOD हा एक हार्मोनल प्रॅाब्लम आहे. ज्यामुळे गर्भाशयात लहान मोठ्या गाठी तयार होतात.
Women Health Problems : वय वाढत जातं तसे महिलांमध्ये अनेक शारीरिक समस्या उद्भवू लागतात. यातच जाणवणारा आणखी एक प्रॉब्लम म्हणजेच हार्मोनल प्रॅाल्बम. तुमच्या आजूबाजूला, मित्र मैत्रिणींमध्ये, घरात तुम्ही PCOD या शब्दाबद्दल नक्कीच ऐकलं असणार. हा शब्द तुमच्या कानावर पडला असणार. अर्थातच याबद्दल सगळ्यांनाच सगळं काही माहित नाहीये. याबद्दल अनेक प्रश्न अजूनदेखील अनेकांना पडले आहेत. PCOD ची समस्या नेमकी का उद्भवते? त्याची लक्षणं काय? त्यावर उपचार काय? PCOD सारख्या समस्या उद्भवूच नये यासाठी काय करायचं? याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
PCOD म्हणजे काय?
PCOD हा एक हार्मोनल प्रॅाब्लम आहे. ज्यामुळे गर्भाशयात लहान मोठ्या गाठी तयार होतात. त्याचाच परिणाम म्हणून पिरीयड्स (मासिक पाळी) अनियमित होतात. वजन वाढतं, प्रेग्नेन्सीमध्ये अडचणी निर्माण होतात, गर्भधारणा होत नाही किंवा झाल्यास त्यात अनेक अडचणी उद्भवतात. या आणि अशा अनेक समस्या PCOD मुळे निर्माण होणाच्या शक्यता आहेत. सुरुवातीच्या काळात ही समस्या 30-35 च्या स्त्रियांना जाणवत होती. मात्र, आता हाच PCOD चा त्रास 18 ते 20 वर्षांच्या मुलींनादेखील व्हायला लागला आहे.
पण हे असं होतंय का, याचं मुख्य कारण काय तर, PCOD ही समस्याच मुळात खराब जीवनशैलीची देण आहे.
PCOD ची लक्षणं काय?
- वजन वाढणे.
- अनियमित मासिक पाळी.
- त्वचेवर पुरळ यायला सुरुवात होते.
- ओटीपोटात दुखणे.
- केसांत कोंडा होणे.
यात कोणत्या गोष्टींचा सर्वाधिक धोका?
डायबीटीस पासून ते गर्भाशयाच्या कॅन्सरपर्यंत हे पेशंटला घेऊन जाऊ शकतं. याचं कारण म्हणजे, PCOD च्या दरम्यान शरीरात इन्स्युलीनचं प्रमाण खूप जास्त वाढतं. ज्यामुळे अंडाशयात सीस्ट म्हणजेच अशुद्ध पाण्याने भरलेल्या फोड्या तयार होतात. ज्याच्या नंतर गाठी तयार होतात. आणि याच कॅन्सरमध्ये परावर्तीत होण्याचे चान्सेस वाढतात.
PCOD वर उपचार काय?
वर नमूद केलेल्या संबंधित लक्षणांपैकी कोणतंही लक्षण तुम्हाला जाणवायला लागल्याच वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. PCOD असण्याची शक्यता असेल तर डॅाक्टर आधी तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगतील. वेळ पडलीच तर, रक्ताच्या चाचण्या, आणि हार्मोन्सच्या चाचण्या होतील. त्यानंतर PCOD असल्याचं कन्फर्मेशन मिळालंच तर पुढचे उपचार लगेच सुरु होतील.
यात महत्वाची बाब म्हणजे ही एक हार्मोनल ट्रीटमेंट आहे, त्यामळे PCOD वर उपचार बरेच दिवस चालतात. उपचाराला मोठा कालावधी लागण्याची शक्यता असते. साधारणतः 12 ते 18 महिने उपचार चालतो. कदाचीत सगळं काही ठिक झाल्यावरही नंतरचे काही दिवस उपचार घेण्याची गरज असते कारण ही एक लाईफस्टाईलशी निगडीत समस्या आहे. या उपचारादरम्यान ॲसीडीटी, वजन वाढणे अशा गोष्टी पण होऊ शकतात.
PCOD होऊच नये यासाठी काय करता येईल?
सगळ्यात आधी आहारात एक बदल करायचाय तो म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल, हाय कॅलरीज आणि हाय कार्बोहायड्रेट्स असणारे खाद्य पदार्थ कमी करायचे शक्य झाल्यास ते टाळायचे. सिगरेट स्मोकींग आणि अल्कोहोल कंसंम्पशनपासून लांब रहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : देशात वाढतायत दम्याचे रूग्ण; आजच 'या' सवयी बदला
- Health Tips : स्मरणशक्ती वाढविण्यासाठी 'या' 5 सूपरफूड्सचा आहारात समावेश करा; जाणून घ्या सविस्तर
- Breastfeeding Week : स्तनपानाशी संबंधित 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )