सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे, वाढलेलं वजन. आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. अनेकदा बाजारात मिळणाऱ्या औषधांचाही आधार घेतला जातो. तसेच डाएटिंगही केली जाते. अनेक लोकांचा असा समज असतो की, डाएटिंग केल्यामुळं वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, डाएटिंग केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जेव्हा तुम्ही उपवास करता किंवा कमी कार्ब असलेल्या पदार्थांचा आहारत समावेश करता, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराची हेळसांड करत असता. यामुळे थेट तुमच्या शरीराव विपरित परिणाम होत असतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यामागे एक वैज्ञानिक कारणंही आहे.


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक डाएटिंग केल्यामुळे प्रत्यक्षात वजन कमी होण्याऐवजी वाढतं. तसेच मांसपेशिंमध्ये कमतरता होते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, 32 लोक जे लठ्ठपणामुळे त्रस्त नव्हते, त्यांनी ज्यावेळी तीन आठवड्यांसाठी 1,300 च्या सरासरीने आहारात कॅलरी घेणं कमी केलं त्यावेळी त्यांचं वजन वाढलं आणि स्नायूंमध्ये कमतरता येण्यास सुरुवात झाली.


कमी आहार घेतल्यामुळे तुमच्या शरीराची ऊर्जा निर्माण होण्याची क्षमता कमी होते. ज्यामुळे थकवा येतो. एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, कमी कार्ब असणाऱ्या आहाराच्या सेवनानं शरीराला थकवा येतो. त्यामुळे आपल्या आहारातून पूर्णपणे कार्ब हद्दपार करणं हानिकारक ठरतं.


केवळ थकवा किंवा कमजोरी नाही तर डायटिंगमुळे शरीराला अनेक आजार होण्याचाही धोका असतो. हावर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच काळापर्यंत उपवास करणाऱ्या लोकांमध्ये डोकेदुखी आणि बद्धकोष्ठ यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त डाएटिंगमुळे केसही गळतात. एवढंच नाहीतर इटिंग डिसऑर्डर यांसारखे आजारही उद्भवू शकतात.


(टिप : सदर गोष्टी संशोधनातून समोर आल्या असून आम्ही त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)


संबंधित बातम्या :