मुंबई : कामाचा ताण, अनियमित जीवनशैली यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच अनेकांना भेडसावणारी समस्या म्हणजे, वाढलेलं वजन. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणं हे अनेकांसाठी जणू आव्हानच आहे. अनेकदा चुकीचा आहार, हे लठ्ठपणाचं कारण समजलं जातं. पण कमी कॅलरी आणि व्यायाम केल्यानंतरही अनेकदा वजन कमी करणं शक्य होत नाही. त्यामुळे गोंधळ उडतो. गोंधळून जाण्यापेक्षा यामागील कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
थायरॉईड
लठ्ठपणाचं सर्वात मोठं कारण म्हणजे, थायरॉईड आहे. जर तुमच्या शरीरातील थायरॉईड योग्य प्रमाणात हार्मोन्स तयरा करु शकत नसेल, तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होता. त्याचसोबत तुम्हाला थकवा, अशक्तपणा, थंडी यांसारख्या लक्षणांचाही सामना करावा लागतो.
मोनोपॉज
संशोधनानुसार, महिलांमध्ये वजन मोनोपॉजच्या वेळी वाढतं. वय वाढण्यासोबतच मेटाबॉलिज्म कमी होतं, ज्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होतं नाही. त्यामुळे महिलांमध्ये मोनोपॉजच्या वेळी वजन वाढल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा महिलांच्या कमेरेच्या भागांत लठ्ठपणा वाढल्याचं दिसून येतं.
Weight Loss | वजन वाढलंय? उपाय शोधताय?, 'हा' सोपा उपाय ट्राय करा
झोपेची कमतरता
आपण अनेकदा ऐकतो की, उत्तम आरोग्यासाठी झोप पूर्ण करणं अत्यंत आवश्यक असतं. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रात्री उशीरापर्यंत जागणं आणि वेळेवर काहीही न खाणं यांमुळे आपल्या कॅलरी वाढतात. ज्यामुळे तुम्हाला लठ्ठपणाचा सामना करावा लागू शकतो.
ताण
शरीरासाठी ताण अत्यंत हानिकारक ठरतो. ताण घेतल्यानं शरीरात कोर्टिसोल हार्मोन तयार होतात. जे शरीराची भूक वाढवण्यासाठी मजत करतात. जर व्यक्ती तणावात असेल तर अनेकदा हाय कॅलरी असणाऱ्या गोष्टी खाण्याची इच्छा होते. त्यामुळे शरीरातील कॅलरी आणखी वाढतात.
धुम्रपान करणं
धुम्रपान करणं आरोग्यसाठी हानिकारक ठरतं. परंतु, जर तुम्ही धुम्रपान करणं थांबवण्याचा निर्णय घेत असाल, तर यादरम्यान तुमचा लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. परंतु, वाढलेलं वजन काही दिवसांनी कमी होतं.
(टिप : सदर गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :