Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कॉफीचा असा करा वापर
Weight Loss : कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत मात्र त्याचे अनेक दुष्परिणामही आहेत. प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कॉफीचा आनंद घेत तुम्ही वजन कमी करु शकता. जाणून घ्या.
![Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कॉफीचा असा करा वापर Weight Loss tips honey coconut oil cinnamon paste with coffee is good diy tricks to lose weight fast marathi news Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कॉफीचा असा करा वापर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/f4373dd55be4ec38b879b4692babf399_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coffee Benefits And Weight Loss : जर तुम्हांला वजन कमी करायचे (Weight Loss) असेल किंवा वजन नियंत्रणात (Weight Control) आणायचे असेल, तर यासाठी कॉफी फायदेशीर ठरु शकते. शरीराला त्वरीत उर्जा देणाऱ्या कॉफी एक पेस्ट मिसळून प्यायल्यावर तुमचं वजन जलद गतीनं कमी होण्यास मदत होईल. याबाबत सविस्तर जाणून घ्या.
- नारळाचे तेल
- दालचिनी पावडर
- मध
पेस्ट कशी तयार कराल?
हे मिश्रण तयार करण्यासाठी तुम्ही 100 ग्रॅम शुद्ध मध घ्या. यामध्ये 120 मिलीलीटर नारळाचे तेल मिसळा. यानंतर यात एक टीस्पून दालचिनी पावडर मिसळा. या सर्व वस्तू चांगल्या प्रकारे एकजीव करा. ही पेस्ट एका काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवा.
पेस्ट वापरण्याची विधी
- दिवसभरात केव्हाही कॉफी पिताना या पेस्टचा वापर करा. पण या पेस्टचं सेवन दिवसातून केवळ दोन वेळाच करा.
- कॉफी तयार केल्यानंतर ही पेस्ट एक चमचा तुमच्या कॉफीत मिसळून प्या. ही पेस्ट ब्लॅक कॉफीमध्ये मिसळून प्यायल्यास अधिक फायदा होईल.
कसा मिळेल फायदा?
तेल, मध आणि दालचिनी तुमचं वजन कसं कमी करू शकतात, असा प्रश्न तुम्हांला जरुर पडला असले. नारळाचे तेल ज्याला फ्रूट ग्रेड ऑइल म्हटलं जातं, हे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. यामुळे चयापचय वाढते. त्यामुळे शरीरात साठलेली चरबी खूप वेगानं कमी होण्यास मदत होते.
मध तुमच्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते. तर दालचिनीमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकतात. या सोबतच हे दोन्ही पदार्थ पचन आणि चयापचय सुधारण्यास मदत करतात. जर तुम्हांला साखरेची समस्या असेल तर तुम्ही मधाऐवजी फक्त फूड ग्रेड खोबरेल तेल आणि दालचिनीचा वापर करू शकता. यामध्ये मधाचा वापर ऐच्छिक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Green Coffee : 'ब्लॅक कॉफी'नंतर आता 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदे
- Orange Juice : लठ्ठपणा टाळायचा असेल तर संत्र्याचा रस पिणं बंद करा, 'हे' आहे कारण
- Digestion : पचनशक्ती वाढवण्याचे आयुर्वेदिक उपाय, पोट राहील साफ
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)