Makar Sankranti 2023 : थंडीमध्ये तिळाचे लाडू अतिशय फायदेशीर, मकरसंक्रांतीला लाडू घरी नक्की बनवा, जाणून घ्या कृती
Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोक घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ बनवतात. यात विशेष स्थान हे तिळाच्या लाडूंना असतं. या लेखाच्या माध्यमातून तिळाचे लाडू कसे बनवायचे, त्यासाठी कोणतं साहित्य आवश्यक आहे हे सांगणार आहोत.
Makar Sankranti 2023 : यंदा मकरसंक्रांत (Makar Sankranti) रविवारी 15 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. पंचांगानुसार, हा सण दरवर्षी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला साजरा केला जातो.
मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोक घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ बनवतात. मकरसंक्रांतीला विशेषत: तीळ आणि गुळाचे अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. यात विशेष स्थान हे तिळाच्या लाडूंना (Til Ladoo) असतं. अनेकांना तिळाचे लाडू बनवायचे असतात पण बऱ्याचदचा असं होतं की हे लाडू फारच कडक होतात. त्यामुळे लाडून घरात बनवण्याचा प्रयोग फसतो मग बाहेरुन लाडू खरेदी करुन आणण्याचा एकमेव पर्याय समोर असतो.
या लेखाच्या माध्यमातून तिळाचे लाडू (Til Ladoo Recipe) कसे बनवायचे, त्यासाठी कोणतं साहित्य आवश्यक आहे हे सांगणार आहोत. खरंतर सध्या थंडीचं वातावरण आहे. सगळीकडे पारा घसरला आहे. अशा वातावरणात तिळाचे लाडू खाणं अतियश उपयुक्त असतं. तिळाच्या लाडूंमध्ये अनेक औषधी गुणधर्म असता. तीळ हे उष्ण असल्यामुळे कडाक्याच्या थंडीत तिळाचं सेवन करणं अतिशय फायदेशीर ठरतं. त्यामुळे यंदाच्या मकरसंक्रांतीला घरच्या घरी तिळाचे लाडू नक्की करुन खा. जाणून घेऊया तिळाचे लाडू बनवण्याची कृती...
साहित्य
पांढरे तीळ - दोन कप
गुळ - पाऊण कप
तूप - एक मोठा चमचा
वेलची पावडर - एक लहान चमचा
भाजलेले शेंगदाणे, काजू, बदाम - दोन मोठे चमचे
लाडू बनवण्याची कृती
- तीळगुळाचे लाडू बवण्यासाठी सर्वात आधी तीळ चांगल्याप्रकारे स्वच्छ करुन, निवडून घ्या.
- यानंतर गॅसवर कढई मध्यम आचेवर ठेवा
- कढई गरम झाल्यावर त्यात तीळ टाकून सुमारे तीन ते चार मिनिटं भाजून ध्या
- तीळाचा रंग बदलल्यावर ते एका भांड्यात काढून घ्या आणि थंड करा
- यानंतर कढईत एक मोठा चमचा भरुन तूप टाकून ते गरम करा
- आता यात गुळाचे तुकडे टाका आणि मंद आचेवर गुळ विरघळू द्या
- एकदा का गुळ विरघळला की त्यात वेलची पावडर, काजू बदाम टाकून व्यवस्थित एकजीव करा
- यानंतर भाजलेले तीळ देखील त्यात टाकून मिश्रण ढवळून एकजीव करा. तिळाचे लाडू बवण्यासाठी गुळ आणि तिळाचं मिश्रण तयार आहे.
- गॅस बंद करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला गरम मिश्रणाचेच लाडू वळायचे आहेत. त्यामुळे मिश्रण कढईतच ठेवलं तर उत्तम.
- लाडू वळण्यासाठी हाताला तूप लावून घ्या
- एक चमच्यात मिश्रण घेऊन ते तळहातावर घ्या आणि गोल आकाराचे लाडू वळा. अशाप्रकार सर्व मिश्रणाचे लाडू बनवा.
- तिळाचे लाडू तयार आहेत. या लाडूंनी तुमच्या कुटुंबियांचं तोंड गोड करा आणि मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू खाण्याचा आनंद लुटा
हेही वाचा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )