एक्स्प्लोर

Rheumatoid Arthritis : तरुणांमध्ये वाढतोय संधीवाताचा धोका, लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; तज्ज्ञांनी दिला इशारा

१२ ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक संधिवात दिवस' पाळला जातो. बैठी जीवनशैली, ताणतणाव आणि अनुवांशिकतेमुळे तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढत चालली आहे.

१२ ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक संधिवात दिवस' पाळला जातो. बैठी जीवनशैली, ताणतणाव आणि अनुवांशिकतेमुळे तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढत चालली आहे. वेळीच निदान, जीवनशैलीत बदल, फिजिओथेरपी आणि मिनीमली इव्हेसिव्ह प्रक्रियांसारख्या प्रगत उपचारांमुळे रुग्णांना सक्रिय जीवन जगता ठेवण्यास येते. संधिवात हा आता केवळ वयोवृध्दांपुरता मर्यादित नसून २० ते ५० वयोगटातील व्यक्तींमध्येही संधिवाताचे निदान होत आहे आणि रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बरेच तरुण रुग्ण सांध्यांमधील कडकपणा किंवा सूज येणे यासारख्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, परंतु भविष्यात त्यांना दीर्घकालीन वेदनांचा सामना करावा लागतो.

दर महिन्याला ओपीडीमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या १० पैकी ४ व्यक्तींना सांधेदुखी आणि संधिवाताशी संबंधित कडकपणाची लक्षणे दिसून येतात. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसुन राहणे, व्यायामाचा अभाव, बसण्याची चुकीची पध्दत, दुखापती, लठ्ठपणा, स्वयंप्रतिकार स्थिती, कौटुंबिक इतिहास आणि ताण हे घटक या स्थितीस कारणीभूत ठरतात. सांधे कडक होणे, वेदना, सूज, उष्णता, हाडांची लवचिकता कमी होणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. जर संधिवाताकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकालीन वेदना, सांध्यांमधील विकृती, अपंगत्व आणि जीवनाची गुणवत्ता खालावू शकते.  नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात राखणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे हे जीवनशैलीतील बदल या आजाराची प्रगती रोखण्यात मदत करतात.

वेळीच लक्ष न दिल्यामुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. लवकर निदान केल्याने सांध्यांची सूज नियंत्रित करण्यास, वेदना कमी करण्यास आणि दीर्घकालीन नुकसान टाळण्यास मदत होते. वेळोवेळी फिजिओथेरपी, औषधं आणि प्रगत उपचार प्रक्रिया रुग्णांना दीर्घकालीन आराम देतात आणि अपंगत्व टाळण्यास मदत करतात. नियमित शारीरिक हालचाली, निरोगी, संतुलित आहार, वजन नियंत्रित राखणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि वैद्यकीय उपचारांनी या समस्येला प्रतिबंध करता येऊ शकतो. म्हणून, सुरुवातीच्या  लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका.

संधिवाताचे प्रकार कोणते

  • ऑस्टियोआर्थराइटिस (Osteoarthritis) : हा संधिवाताचा सर्वात सामान्य प्रकार आहे. यामध्ये सांध्यातील कुर्च्याची (कार्टिलेज) झीज होते, ज्यामुळे हाडे एकमेकांवर घासली जातात. 
  • रुमेटाईड अर्थरायटीस (Rheumatoid Arthritis) (RA) : यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती सांध्यांच्या अस्तरावर हल्ला करते. यामुळे सांध्यांमध्ये सूज, वेदना आणि कडकपणा येतो. याची लक्षणे सहसा सकाळच्या अधिक तीव्र असतात. 
  • सोरायटिक संधिवात (Psoriatic Arthritis) : हा सोरायसिस (Psoriasis) नावाच्या त्वचेच्या आजाराशी संबंधित आहे. यात सांध्यांव्यतिरिक्त त्वचेवरही परिणाम होतो. 
  • गाऊट (Gout) : हा एक वेदनादायक संधिवात आहे जो रक्तातील यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने होतो. हे युरिक ऍसिड क्रिस्टल्स सांध्यांमध्ये जमा झाल्यामुळे तीव्र वेदना होतात आणि सूज येते. 
  • मुलांमधील संधिवात (Juvenile Idiopathic Arthritis - JIA) : हा लहान मुलांमध्ये आढळणारा संधिवात आहे. याची लक्षणे वयाच्या १६ वर्षांपूर्वी दिसतात आणि आयुष्यभर टिकून राहू शकतात.

जीवनशैलीत योग्य बदल करत संधीवाताचे करा व्यवस्थापन 

  1. नियमित व्यायाम : चालणे, योगा, पोहणे किंवा स्ट्रेचिंग यासारखे सौम्य व्यायाम सांध्यांमधील कडकपणा कमी करतात आणि सांध्यांची हालचाल सुलभ करतात.
  2. संतुलित आहार : ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सयुक्त आहाराचे सेवन यामध्ये मासे, अक्रोड, जवसाच्या बिया यांचा समावेश करा. साखर, फास्टफूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा
  3. वजन नियंत्रण राखा : जास्त वजन हे सांध्यांवर ताण आणते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे हे संधीवात नियंत्रणाचे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.
  4. तणावाचे व्यवस्थापन : ध्यान, प्राणायाम आणि पुरेशी झोप यामुळे तणाव कमी करण्यास  मदत होते.
  5. औषधोपचार आणि फिजिओथेरपी : डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार आणि फिजिओथेरपी केल्यास संधीवाताची तीव्रता कमी करण्यास मदत होते.

- डॉ अनुप गाडेकर, ऑर्थोपेडिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, पुणे

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Embed widget