Patanjali: पंचमहाभूत म्हणजे काय? रोगांशी लढण्याचे नैसर्गिक शस्त्र 'नेचरोपॅथी' कसे वापरत आहे पतंजली ?
पंचमहाभूतांवर आधारित नेचरोपॅथी उपचारपद्धती नैसर्गिक उपाय, औषधी वनस्पती आणि योग यांच्या साहाय्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून रोग मुळापासून दूर करण्याचा दावा करते

Patanjali: आधुनिक जीवनशैलीत प्रदूषण, ताणतणाव आणि असंतुलित आहारामुळे शरीरात विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) साचत आहेत. यामुळे डायबिटीज, हायपरटेंशन, लठ्ठपणा, यकृताचे विकार आणि ऑटोइम्यून रोग वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत आमच्या योगपीठाची नेचरोपॅथी चिकित्सा लोकांसाठी वरदान ठरत असल्याचा पतंजलीचा दावा आहे. पतंजलीचे म्हणणे आहे की त्यांचे वेलनेस सेंटर्स देश-विदेशात नेचरोपॅथीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहेत. (Patanjali News)
पतंजलीने सांगितले, “आमची नेचरोपॅथी पद्धती पंचमहाभूतांवर (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) आधारित आहे. येथे माती चिकित्सा, जल चिकित्सा (हायड्रोथेरपी), उपवास चिकित्सा, सूर्यस्नान, कुंजल - वस्ती यांसारखे नैसर्गिक उपचार दिले जातात. यासोबत आयुर्वेदिक जडीबुटी आणि दिव्य औषधींचा समन्वय केला जातो.” पतंजलीचा दावा असा आहे की फक्त 7 ते 21 दिवसांच्या नेचरोपॅथी उपचारांनी शरीरातील 70 - 80% टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि इन्सुलिन रेझिस्टन्स, थायरॉइडचे असंतुलन व लिव्हरमध्ये साचलेली चरबी यांसारख्या समस्या नियंत्रित होतात.
हजारो रुग्णांना मिळाले औषधमुक्त जीवन , पतंजलीचा दावा
पतंजलीचे म्हणणे आहे की त्यांच्या वेलनेस सेंटर्समध्ये नेचरोपॅथीद्वारे हजारो रुग्णांचे यशस्वी उपचार झाले आहेत. डायबिटीज रुग्णांच्या औषधांचे प्रमाण निम्म्याने कमी झाले, तर अनेक जण पूर्णपणे औषधमुक्त जीवन जगू लागले आहेत. लठ्ठपणाचे रुग्ण केवळ नैसर्गिक उपचारांच्या साहाय्याने 15- 20 किलो वजन कमी करण्यात यशस्वी झाले. इतर अनेक रोगांमध्येही रुग्णांना समाधानकारक आणि आश्चर्यकारक आराम मिळाल्याचा दावा आहे.
नेचरोपॅथी रोगाच्या मुळावर उपाय करते : आचार्य बालकृष्ण
आचार्य बालकृष्ण म्हणतात, “नेचरोपॅथी रोगाचे मूळ कारण दूर करते. भारत पुन्हा विश्वगुरू बनावा आणि प्रत्येक व्यक्तीने निरोगी, सुदृढ जीवन जगावे हे आमचे ध्येय आहे. पतंजली नेचरोपॅथीची खासियत म्हणजे येथे उपचारासोबत योग, प्राणायाम आणि सात्त्विक आहाराचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे व्यक्ती घरात परतल्यानंतरही आरोग्यदायी जीवनशैली अनुसरू शकते.”
सध्या पतंजली वेलनेस हरिद्वार, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू यांसह देशातील अनेक शहरांत जागतिक दर्जाची नेचरोपॅथी केंद्रे चालवत आहे. विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. पंचमहाभूते म्हणजे सृष्टीतील पाच मूलभूत घटक. भारतीय तत्त्वज्ञान, आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार या सर्व शास्त्रांमध्ये पंचमहाभूतांचे महत्त्व सांगितले आहे. हे पाच घटक मिळून विश्वातील प्रत्येक वस्तू, शरीर, मन आणि ऊर्जा घडवतात. पंचमहाभूतांवर आधारित नेचरोपॅथी उपचारपद्धती नैसर्गिक उपाय, औषधी वनस्पती आणि योग यांच्या साहाय्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून रोग मुळापासून दूर करण्याचा दावा करते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























