Paper Straw : कागदी स्ट्रॉचा वापर आरोग्यासाठी घातक! हानिकारक रसायनांचा शरीरावर वाईट परिणाम; संशोधनात धक्कादायक माहिती समोर
Paper Straw Effect on Health : आता प्लास्टिकच्या स्ट्रॉची जागा कागदाच्या स्ट्रॉचा वापर वाढला आहे. या कागदी स्ट्रामधील रसायन शरीरासाठी घातक असल्याचं अहवालात समोर आलं आहे.
मुंबई : प्लास्टिकचा (Plastic) वापर कमी करण्यासाठी सध्या सरकार आणि नागरिक सर्वच प्रयत्नशील आहेत. सिंगल यूज प्लास्टिकचा (Single Use Plastic) वापर कमी करण्यासाठी अगदी छोटे-मोठे फेरीवालेही प्रयत्न करताना दिसत आहे. प्लास्टिकच्या प्लेट आणि चमचे यांची जागा आता कागदी प्लेट आणि लाकडी चमचे यांनी घेतली आहे. यासोबतच आजकाल पॅकेज बंद ड्रिंक्ससोबत येणाऱ्या प्लास्टिकच्या स्ट्रॉ (Plastic Straw) ऐवजी कागदी स्ट्रॉचा (Paper Straw) वापरही वाढलेला दिसत आहे. प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने हे एक चांगलं पाऊल मानलं जात आहे. पण, एक अहवालात कागदाच्या स्ट्रॉचे शरीरावर होणार वाईट परिणाम समोर आले आहेत.
कागदी स्ट्रॉचा वापर आरोग्यासाठी हानिकारक
कागदाच्या स्ट्रॉमध्ये विविध रसायने असतात, ज्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो, असं एका अहवालात समोर आलं आहे. पेपर स्ट्रॉ बनवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर केला जात असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. या हानिकारक रसायनांचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे हा पेपर स्ट्रॉ देखील आरोग्यासाठी चांगला नसल्याचं या अहवालात समोर आलं आहे. कागदी स्ट्रॉसंबंधित अभ्यासात समोर धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कागदी स्ट्रॉ संबंधित धक्कादायक माहिती
स्काय न्यूजनुसार, बेल्जियमच्या काही संशोधकांनी कागदी स्ट्रॉवर एक अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये समोर आलं आहे की, पेपर स्ट्रॉमधून कोणतंही पेय पिणं हानिकारक ठरू शकते. कागदी स्ट्रॉचा वापर आरोग्यासाठी घातक असल्याचा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, कागदी स्ट्रॉमध्ये काही विषारी रसायने असतात, ही हानिकारक रसायने माणसांसाठी घातक ठरतात. ही रसायने सजीव आणि पर्यावरणालाही धोका निर्माण करू शकतात. या अभ्यासानुसार, जेव्हा अनेक कागदी स्ट्रॉवर संशोधन केल्यानंतर समोर आलं आहे की, कागद आणि बांबूपासून बनवलेल्या कागदी स्ट्रॉमध्ये पॉली आणि परफ्लुरोआल्काइल पदार्थ (PFAS) आढळून आलं.
घातक रसायनांचा शरीरावर वाईट परिणाम
कागदी स्ट्रॉमध्ये आढळणारे पॉली आणि परफ्लुरोआल्काइल पदार्थ मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत. या अहवालनुसार, बाजारात पेपर स्ट्रॉ बनवणाऱ्या 20 पैकी 18 कंपन्या स्ट्रॉमध्ये ही हानिकारक रसायने आढळली आहेत. दरम्यान, हे पीएफए त्या पेयामध्ये देखील विरघळतं की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हानिकारक रसायनांमुळे अनेक आजारांना आमंत्रण
ही घातक रसायने तुमच्या शरीरात दीर्घकाळ राहू शकतात. या रसायनामुळे थायरॉईड, कोलेस्ट्रॉल वाढणे, यकृताचा त्रास, किडनीचा कर्करोग, जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी, लसींचा कमी परिणाम अशा समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही स्टीलच्या स्ट्रॉमध्ये पीएफएएसचे कोणतेही ट्रेस आढळले नाहीत आणि हे स्ट्रॉ सुरक्षित आहेत, असंही या अभ्यासात समोर आलं आहे. कागदाच्या स्ट्रॉमध्ये मोठ्या प्रमाणात पीएफएएसची आढळलं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sleep Disorder : तुम्हीही झोपेत बडबड करताय? 'हे' असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण; दुर्लक्ष करु नका अन्यथा...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )