एक्स्प्लोर

Hangover: पार्टीच्या दुसऱ्या दिवशी हँगओव्हर उतरवण्यासाठी कामी येतील 'हे' घरगुती उपाय

New Year Celebration Hangover: न्यू इयर सेलिब्रेशन करताना अतिमद्य सेवनामुळे दुसऱ्या दिवशी हँगओव्हरचा त्रास होतो. काही घरगुती उपायाद्वारे हँगओव्हरचा त्रास कमी करू शकता.

Hangover:  सध्या बहुतांशी जण लग्न, पार्टी, वीकेंड किंवा इतर कोणत्याही प्रसंगी मद्याचे सेवन करतात. न्यू इयर सेलिब्रेशन (New Year Celebration) करतानादेखील जोरदार पार्टी केली जाते. पार्टी सेलिब्रेशननंतर दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास जाणवतो. डोकेदुखी, मळमळणे आदी प्रकारचा त्रास होतो. याला हँगओव्हर (Hangover) असेही म्हटले जाते. मद्याच्या अतिसेवनाने हा त्रास होतो. 

हँगओव्हर हा अतिशय त्रासदायक ठरतो. तुम्हाला हँगओव्हरपासून सुटका हवी असेल तर तुम्ही घरगुती उपायदेखील वापरू शकता. घरगुती उपायाद्वारे (Home Remedies for Hangover) तुमचा हँगओव्हरचा त्रास कमी होईल. 

पाणी

हँगओव्हरपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अधिकाधिक पाणी पिणे. अल्कोहोलमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण करते. वारंवार लघुशंकेला जाणे, उल्टी होणे आदींमुळे शरिरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा अधिकाधिक पाणी पिऊन आपले शरीर पुन्हा हायड्रेट करू शकता.

मध

हँगओव्हरची लक्षणे कमी करण्यासाठी मध हा एक चांगला उपाय आहे. मधामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे अल्कोहोलचे परिणाम कमी करण्यास मदत होते. मधामध्ये फ्रुक्टोज (Fructose) देखील आढळतो, जो साखरेचा एक प्रकार आहे. यामुळे शरीरातील हँगओव्हरची लक्षणे कमी होतात.

आलं

हँगओव्हर कमी करण्यासाठी आलं हा रामबाण उपाय आहे. आलंमुळे अल्कोहोल पचन करण्यास मदत करते आणि पोटातील दाह शांत होतो. त्यामुळे हँगओव्हरचा त्रास बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते. 
 

केळी

अतिमद्यपान केल्याने तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता होते. हे पूर्ण करण्यासाठी केळी खाणे हा एक सोपा उपाय आहे. केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. केळी पोटाला आराम आणि एनर्जी लेव्हल वाढवण्यासही मदत करते.
 

टोमॅटो ज्यूस

हँगओव्हरपासून मुक्त होण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे टोमॅटोचा रस. त्यात  फ्रुक्टोज (Fructose) असते. यामुळे अल्कोहोलचे जलद चयापचय करण्यास मदत होते. तसेच, व्हिटॅमिन सीचे प्रमाण हँगओव्हरपासून मुक्त होण्यास मदत करते. 

हँगओव्हर उतरवण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी प्राशन करू शकता. लिंबू पाण्यामुळे तुम्हाला चांगला आराम वाटू शकतो. हँगओव्हर असतानादेखील नाश्ता, जेवण वेळेवर करा आणि भरपूर झोप घ्या. झोप पूर्ण झाल्याने आराम वाटू शकतो. रात्रीच्या सेलिब्रेशनमुळे हँगओव्हरचा खूपच त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget