Anxiety | जे कधीही व्यायाम करत नाही, त्यांच्यासाठी महत्वाची बातमी!
नियमित व्यायामामुळे चिंता वाढण्याचा धोका 60 टक्क्याने कमी होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. सतत डोक्यात काहीतरी सुरु असतं. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून अकाली मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. तुम्हीही मानसिक आरोग्यमुळे त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. फ्रंटियर्स इन सायकियाट्री जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासानुसार, जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांना चिंता वाढण्याचा धोका सुमारे 60 टक्क्याने कमी आहे. चला या संदर्भात अधिक जाणून घेऊया.
आपले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय उपाय करावे यासाठी तुम्ही ऑनलाइन शोध घेतला तर असंख्या पर्याय येतात. या सर्वात एक कॉमन पर्याय येईल तो म्हणजे काही शारीरिक व्यायाम करणे, मग ते चालणे असो किंवा सांघिक खेळ खेळणे.
चिंता विकार - सध्याच्या काळात हा आजार लोकांच्या आयुष्यात लवकर येत आहे. जगातील लोकसंख्येच्या अंदाजे 10 टक्के मानसिक आजाराने प्रभावित होण्याचा अंदाज आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हे प्रमाण दुप्पट असल्याचे आढळले आहे. चिंतेवरील उपचारांसाठी एक आशादायक पाऊल म्हणजे शारीरीक व्यायाम आहे. योग्य आहार, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जीवावर चिंता नक्कीच दूर ठेवता येते.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी स्वीडनमधील संशोधकांनी जगातील सर्वात मोठ्या लांब पल्ल्याच्या क्रॉस-कंट्री स्की रेस (Vasaloppet) मध्ये 1989 ते 2010 दरम्यान भाग घेतलेल्या लोकांचा अभ्यास केला. यात सहभागी लोकांमध्ये इतरांच्या तुलनेत चिंता वाढण्याचा धोका कमी असल्याचे समोर आले आहे.
हा अभ्यास स्त्री आणि पुरुष दोन्ही लिंगांतील लोकसंख्येच्या व्याप्तीतील सर्वात मोठ्या महामारी अभ्यासातील जवळजवळ 400,000 लोकांच्या डेटावर आधारित आहे.
"आम्हाला आढळले आहे की अधिक शारीरिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैली असलेल्या गटामध्ये 21 वर्षांपर्यंतच्या फॉलो-अप कालावधीत चिंता विकार विकसित होण्याचा धोका जवळजवळ 60 टक्के कमी आहे," असे पेपरचे पहिले लेखक मार्टिन स्वेन्सन आणि त्यांचे सहकारी स्वीडनच्या लुंड विद्यापीठातील प्रायोगिक वैद्यकीय विज्ञान विभागाचे प्रमुख अन्वेषक, टॉमस डिअरबॉर्ग म्हणाले. स्वेन्सन पुढे म्हणाले, "शारीरिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैली आणि चिंता कमी होण्याचा धोका यांच्यात हा संबंध दिसून आला."
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )