एक्स्प्लोर

सतत खोकला येतो? श्वास घेताना त्रास होतो? जाणून घ्या 'पल्मोनरी फायब्रोसिस' विषयी..

फुफ्फुसातील फायब्रोसिसमुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो.

Pulmonary fibrosis : खोकल्यामुळे तुम्ही तुमची दैनंदिन कामे सहजतेने करू शकत नाही का? थकवा किंवा अचानकपणे वजन कमी झाले आहे का? तुम्हाला नेहमीच दम लागतो का? मग, तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल कारण ही सारी लक्षण पल्मोनरी फायब्रोसिसची देखील असू शकतात.  

पल्मोनरी फायब्रोसिस हा एक फुफ्फुसाचा आजार आहे जो फुफ्फुसाच्या ऊतींना इजा आणि जखम झालेल्या ठिकाणी होतो. फुफ्फुसातील फायब्रोसिसमुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. साथीच्या आजारादरम्यान, अनेक पोस्ट-कोविड रूग्णांचे निदान झाले आहे आणि त्यासाठी त्वरित वैद्यकीय कारवाई आवश्यक आहे. ही स्थिती गंभीर आहे, तुमची मानसिक शांतता हिरावून घेऊ शकते. दैनंदिन कामे सहजतेने करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम करते. पल्मोनरी फायब्रोसिसमुळे फुफ्फुसाचे नुकसान अपरिवर्तनीय आहे हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. अशाप्रकारे, लवकर निदान, जलद उपचार, पुरेसे हायड्रेशन, व्हिटॅमिन सी आणि झिंक सप्लीमेंट्सची निवड फुफ्फुसातील फायब्रोसिस व्यवस्थापित करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

पल्मोनरी फायब्रोसिसची लक्षणे 
श्वास घेताना त्रास होणे (डिस्पनिया), वजन कमी होणे, थकवा, कोरडा खोकला, अशक्तपणा, अचानकपणे वजन कमी होणे, स्नायू दुखणे आणि बोटांचे टोक गोलाकार होणे (क्लबिंग) ही पल्मोनरी फायब्रोसिसची लक्षणे आहेत. ही लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू देखील शकतात. ही लक्षणे कालांतराने आणखी वाढत जातात आणि एखाद्याचे आरोग्य बिघडू शकते.  तुम्हाला माहीत आहे का? ज्यांना तीव्र त्रास होतो त्यांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्याची आवश्यकता भासते.

पल्मोनरी फायब्रोसिसची  कारणे: फुफ्फुसातील हवेच्या पिशव्या (अल्व्होली) सभोवतालच्या आणि दरम्यानच्या ऊती जाड झाल्यासारख्या दिसतात.  त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे तुम्ही नीट श्वास घेऊ शकणार नाही. काही विषारी द्रव्ये, काही वैद्यकीय परिस्थिती, रेडिएशन थेरपी आणि काही औषधे फुफ्फुसाच्या नुकसानास कारणीभूत ठरु शकतात. या स्थितीमागील मूळ कारण ठरवण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. ज्यांना श्वासोच्छवासाच्या समस्या आहेत आणि नंतर ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा लोकांना हा आजार होऊ शकतो.  

जोखीम घटक: मुले, मध्यमवयीन आणि वृद्ध , धूम्रपान करणा-या व्यक्तींना विविध कारणांमुळे फुफ्फुसीय फायब्रोसिस होऊ शकतो.
उपचार: तुमची तपासणी आणि चौकशी केल्यानंतर, डॉक्टर तुमच्यासाठी उपचार पद्धती ठरवतील. तुम्हाला अँटीबायोटिक्स, कॉर्टिकोस्टेरॉइड औषधे, अँटीफायब्रोटिक्स किंवा इतर औषधे घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

पल्मोनरी फायब्रोसिस रोखण्यासाठी उपाय : सहनशक्ती वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करा, फुफ्फुसाचे आरोग्य सुधारण्यासाठी श्वासोच्छवासाची तंत्रे, समुपदेशन, वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. तुमच्या श्वसन प्रणालीच्या सुरळीत कार्यासाठी आणि तुमची प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. धूम्रपान करू नका आणि पॅसिव्ह स्मोकींग देखील टाळा. तुमच्या रोजच्या आहारात ताजी फळे, तृणधान्य आणि दुग्धजन्य पदार्थांची निवड करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. स्वत: च्या मर्जीने औषधोपचार करू नका.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार
राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ आणि मोठं नुकसान
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
Embed widget