Tea : चहाचे शौकीन आहात? दिवसातून किती कप चहा पिणे योग्य? काय सांगतो रिपोर्ट
Health News : जर तुम्ही दररोज पाच ते सहा कप पेक्षा जास्त चहा पीत असाल तर तुम्ही आजारांना आमंत्रित करत आहात. चहाच्या अतिसेवनामुळे तुम्हाला अनेक आजार जडू शकतात.
Health News : जगाच्या कानाकोपऱ्यात चहा पसंत केला होतो. सकाळी पेपर वाचताना, अथवा टिव्ही पाहताना चहा पितात.. दुपारी चहा पितात अन् संध्याकाळीही चहा पितात.. टेन्शनमध्ये चहा पितात त्याशिवाय, घरात कुणी नातेवाईक आले तरी चहाच केला जातो... भारतामध्ये चहा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक चहाप्रेमी आहेत. पण दिवसभरात किती कप चहा पिणे योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही जण तर इतके चहाप्रेमी आहेत की, जितक्यावेळी चहा प्यायला बोलवलं तितक्यावेळी चहा पिण्यासाठी येणारेही आहेत.. पण जास्त चहा प्यायल्यास काय नुकसान होऊ शकतं? याबाबतचा रिपोर्ट समोर आला आहे.
जर तुम्ही दररोज पाच ते सहा कप पेक्षा जास्त चहा पीत असाल तर... तुम्ही आजारांना आमंत्रित करत आहात. अति चहा पिल्यामुळे तुम्हाला अनेक आजार जडू शकतात. मग प्रश्न असा की, दिवसभरात किती चहा पिणं योग्य आहे. हेल्थलाइनच्या रिपोर्ट्सनुसार, चहामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे त्याला वर्षानुवर्षे औषध म्हणून वापरले जाते. पण याचं अति प्रमाणात सेवन केल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.. जसे की डिहायड्रेशन, एसिडिटी, ब्लड प्रेशर, पोटाच्या समस्या, छातीत दुखणे, आतड्यांवर प्रभाव यासारखे अनेक आजार होऊ शकतात. अति चहा सेवनामुळे एखादा तंदुरुस्त व्यक्तीही आजारी पडू शकतो.
ब्राऊन युनिवर्सिटीच्या रिपोर्ट्सनुसार, ग्रीन आणि ब्राऊन चहामध्ये प्रति कप 40 मिलीग्रॅम कॅफीन असते. त्यामुळे चहाचे अति सेवन केल्यामुळे तुम्हाला व्यसन लागू शकते. तसेच तुम्हाला एखाद्या कामावर लक्ष केंद्रीत करणं कठीण होऊ शकते. त्याशिवाय, तुम्हाला अस्वस्थ वाटू शकेल आणि स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. त्याशिवाय झोपेची वेळही बदलू शकते. कॅफीनच्या थोड्या वापराचे तुम्हाला अनेक फायदेही होऊ शकतात. पण याच्या अति वापरामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनेकांना चहा प्यायल्याने फायदे आणि तोटे झाल्याचं दिसून येतं. पण जास्त चहा तुम्हाला नक्कीच नुकसानदायक आहे, हे रिपोर्टमधून समोर आले.
किती कप चहा योग्य ?
दिवसातून किती कप चहा पिणे योग्य, ज्यामुळे आरोग्याला कोणताही धोका होणार नाही. हेल्थलाइनच्या रिपोर्ट्स, दिवसातून तुम्ही तीन ते चार कप (710–950 मिली) चहा पिऊ शकता. एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये पब्लिश झालेल्या एका अभ्यासानुसार, दिवसातून दोन कप चहा पिणाऱ्यांना मृत्यूचा धोका 9 ते 13 टक्के कमी आहे. तर POPSUGAR च्या रिपोर्ट्सनुसार, UCLA आणि यूनिवर्सिटी ऑफ मॅरीलँड मेडिकल सेंटरमध्ये एका कँसर एपिडेमियोलॉजी रिसर्चर्स जूओ फेंग झांग यांनी एका दिवसात दोन तीन कप पिण्याचा सल्ला दिला. काही रिपोर्ट्सनुसार, अति सेवनामुळे अनेक आजार जडत असल्याचे सांगितलेय. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी दिवसात फक्त तीन ते चार कप चहा प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )