कोणत्या परिस्थितीत तंबाखू सेवनाची इच्छा होते? लक्षात घ्या, तंबाखूचे व्यसन टाळण्यासाठी या सोप्या टिप्स
दीर्घकाळ तंबाखुच्या सेवनाने हृदयरोग, श्वसनाच्या समस्या आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तंबाखू सोडल्यास आरोग्य आणि जीवनमानात लक्षणीय सुधारणा होऊ शकते.

Health: मुले, किशोरवयीन आणि प्रौढांसह सर्व वयोगटातील लोकांमध्ये तंबाखूचा वापर वाढत आहे. तरुणांना सिगारेट, गुटखा, हुक्का आणि तंबाखुजन्य पदार्थ आकर्षित करतात. बहुतेकदा ते मित्रांच्या दबावाखाली किंवा सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आणि काहीतरी नवीन ट्राय करण्याच्या नादात व्यसनाला बळी पडतात. प्रौढांमध्ये तणाव हे व्यसनाचे प्रमुख कारण ठरत आहे. दुर्दैवाने, त्याचा परिणाम गंभीर आहे आणि त्याचा परिणाम एखाद्याच्या संपूर्ण आरोग्यावर होतो.
तंबाखू हा तोंड, फुफ्फुस, घसा आणि अन्ननलिकेचा कर्करोगासह अनेक प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित आहे. दीर्घकाळ तंबाखुच्या सेवनाने हृदयरोग, श्वसनाच्या समस्या आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तंबाखू सोडल्यास आरोग्य आणि जीवनमानात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. म्हणून, लक्षात ठेवा तंबाखुचे व्यसन सोडायला कधीही उशीर झालेला नसतो. उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी आजच तंबाखू सोडण्याचा निर्णय घ्या व त्या मार्गाने प्रवासाला सुरुवात करा. तंबाखूचा व्यसन कायमचा सोडण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत त्यांचे पालन करा. साताऱ्याचे ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ मनोज लोखंडे यांनी तंबाखूपासून व्यसन टाळण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.
एक तारीख निश्चित करा:
तंबाखूचा सेवन टाळण्यासाठी एक ध्येय निश्चित करणे, एक तारीख निवडणे आणि मानसिक तयारी करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना कळवा जेणेकरून ते तुमच्या तंबाखू सोडण्याच्या प्रवासात तुम्हाला पाठिंबा देऊ शकतील.
ट्रिगर्स समजून घ्या :
कोणत्या परिस्थितीत किंवा भावना तुम्हाला तंबाखूच्या सेवनाची इच्छा निर्माण करते ते लक्षात घ्या. तणाव, कंटाळा येणे आणि सामाजिक दबावामुळे तुम्हाला त्याचे व्यसन जडू शकते. चालणे किंवा खोल श्वास घेण्यासारख्या निरोगी सवयींचे पालन करा. गाजर आणि सेलेरी, सुकामेवा आणि तेलबिया आणि पॉपकॉर्न सारख्या निरोगी पर्यायांसह व्यसन टाळण्याचा प्रयत्न करा.
निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (NRT ):
निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीसारख्या पर्यायाचा अवलंब करता येईल. कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्याचे पालन करा.
व्यसनाचा मोह टाळा
तंबाखू सेवनाची इच्छा निर्माण करणाऱ्या लोकांपासून, ठिकाणांपासून किंवा दिनचर्येपासून दूर रहा, विशेषतः सोडल्यानंतर पहिल्या काही आठवड्यात अशा गोष्टींपासून दूर रहा.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
डॉक्टर, सल्लागार हे तुम्हाला. व्ससन सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान मार्गदर्शन आणि भावनिक आधार देऊ शकतात.जर तुम्ही कमीत कमी एक महिना तंबाखूपासून दूर राहण्यास यशस्वी झाला असाल, तर स्पा, मसाज किंवा तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जा त्याचा आनंद साजरा करा.
हेही वाचा:
मुसळधार पावसाचा जोर कमी होणार! आज कुठं यलो तर ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























