Health Tips : शरीरात हिमोग्लोबिन किंवा रक्ताची कमतरता आहे? 'हे' तीन घरगुती उपाय तुमच्यासाठी
Health Tips : शरीरातील हिमोग्लोबिन कोणत्याही औषधांशिवाय वाढवता येते. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आहारात बदल करायचा आहे
Health Tips : हिमोग्लोबिन (Hemoglobin) किंवा रक्ताची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे जी कोणत्याही वयोगटातील लोकांमध्ये अगदी सहज जाणवू शकते. रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमियासारखी स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत, काही सोपे घरगुती उपाय अॅनिमिया (Anemia) दूर करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. शरीरातील हिमोग्लोबिन कोणत्याही औषधांशिवाय वाढवता येते. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आहारात (Food) बदल करायचा आहे आणि तुमची जीवनशैली (Lifestyle) थोडी बदलावी लागेल. जाणून घेऊयात अशक्तपणा दूर करण्यासाठी तीन सोपे घरगुती उपाय (Home Remedies) नेमके कोणते आहेत.
मोरिंगाची पाने :
रक्ताची कमतरता किंवा अॅनिमियामध्ये मोरिंगाची पाने फायदेशीर ठरू शकतात. मोरिंगाच्या पानांमध्ये लोह, व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि फॉलिक अॅसिड यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात जे हिमोग्लोबिन (Hemoglobin) वाढवण्यास मदत करतात. मोरिंगाची पाने तुम्ही कोशिंबीर म्हणून खाऊ शकतात किंवा चटणी बनवूनही खाता येतात. मोरिंगाची पाने नियमित खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अशक्तपणा दूर होतो.
तिळाचं सेवन करा
तिळामध्ये लोह आणि फायबरचं प्रमाण चांगलं असतं, जे अॅनिमिया दूर करण्यासाठी मदत करतात. तिळाच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते. अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता असलेले लोक रोज तीळ खाऊ शकतात. यासाठी तुम्ही एक चमचा तीळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. तिळाची चटणी किंवा लाडू बनवूनही तुम्ही याचे सेवन करू शकता. तिळाच्या सेवनाने अॅनिमिया बरा होऊ शकतो.
तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने अॅनिमिया किंवा रक्ताची कमतरता भरून काढता येते. तांब्यापासून थोड्या प्रमाणात लोह पाण्यात विरघळते, ज्यामुळे तुमचा हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यात किंवा ग्लासमध्ये पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल आणि हिमोग्लोबिनची पातळी देखील सामान्य होईल आणि तुम्हाला अॅनिमियाच्या समस्येपासून आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )