Health Tips: चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर सावधान! या सवयीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान
Water After Tea Side Effects : चहा प्यायल्यानंतर शरीर सक्रिय होते. पण काही लोकांना अशी सवय असते की ते चहा प्यायल्यानंतर लगेच पाणीदेखील पितात. आणि हीच सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

Water After Tea Side Effects : काही लोक चहा (Tea) प्यायल्यानंतर लगेचच पाणी पितात. काहींना ही सवय बरी वाटते. पण त्यांची ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चहाचा एक घोट घेतला की तुम्हाला क्षणार्धात ताजंतवानं वाटतं. काहीजण तर दिवसातून अनेक कप चहा पितात. काहींना चहाची इतकी सवय असते की ते त्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत. बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहा प्यायल्यानंतर शरीर सक्रिय होते. पण काही लोकांना अशी सवय असते की ते चहा प्यायल्यानंतर लगेच पाणीदेखील पितात. आणि हीच सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
चहा प्यायल्यावर लगेच पाणी का पिऊ नये?
अनेक ज्येष्ठ व्यक्ती चहा प्यायल्यानंतर पाणी पिणे टाळतात. पण काहींना चहावर पाणी पिण्याचा मोह टाळता येत नाही. यानंतरही जर तुम्ही तुमची सवय सुधारली नाही तर तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. थंड आणि गरम अन्न खाल्ल्यानेही दाताला झिणझिण्या येतात. केवळ एवढेच नाही तर चहावर पाणी पिण्याचे इतरही अनेक तोटे आहेत, जाणून घेऊया...
चहा झाल्यावर पाणी पिण्याची चूक करू नका
1. चहावर पाणी पिण्याची तुम्ही तुमची सवय सुधारली नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दातदुखीचा त्रास होऊ शकतो. केवळ एवढंच नव्हे तर अपचन, लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिटी आणि गॅसचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो.
2. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते. घसादुखीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे चहानंतर पाणी पिण्याची चूक करू नका.
3. चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने काही जणांच्या नाकातून रक्त येऊ लागते. अशी लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे. आणि या चुकीतून धडा घेत ही वाईट सवय सोडून दिली पाहिजे.
4. चहावर पाणी प्यायल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर दातांमध्ये पिवळेपणा, सेन्सेटिव्हिटी यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. कधी कधी तर दात काढण्याची वेळही येते. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि चहावर पाणी पिणं टाळा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
