एक्स्प्लोर

Health Tips : तणाव, चिंता आणि मूड स्विंग यामध्ये नेमका फरक काय? वाचा सविस्तर माहिती

Health Tips : आजही अनेक लोकांना तणाव (Strees), मूड स्विंग (Mood Swing) आणि चिंता (Anxiety) हे एकच आजार वाटतात. मात्र, यामध्ये बराच फरक आहे.

Mental Health : जगभरात पाहिल्यास, मानसिक आरोग्य (Mental Health) ही एक मोठी समस्या निर्माण होऊ लागली आहे. अनेकदा लोक या आजारा संदर्भात बोलताना आणि संघर्ष करताना दिसतात. पण, अनेकांना मानसिक आरोग्याशी संबंधित गोष्टी समजत नाहीत. यामुळेच लोक त्यातून पूर्णपणे सावरत नाहीत. किंवा त्यांना त्यातून सावरायला वेळ लागतो. आजही असे बरेच लोक आहेत ज्यांना तणाव (Strees), मूड स्विंग (Mood Swing) आणि चिंता (Anxiety) हे एकच आजार वाटतात. मात्र, यामध्ये बराच फरक आहे. हा फरक नेमका कोणता ते जाणून घ्या.   
 
तणाव आणि चिंता एकसारखे नाही 
 
अनेकदा लोकांना तणाव आणि चिंता यातील नेमका फरक कळत नाही. कारण या दोन्ही आजारांतील लक्षणं जवळपास सारखीच आहेत. जसे की, हृदयाचे ठोके अचानक जलद गतीने वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, किंवा अतिसार, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवणे. या दोघांमध्ये थोडाफार फरक नक्कीच आहे.

तणाव आणि चिंता यांच्यातील फरक नेमका काय? 
 
तणावाचा अवधी खरंतर फार कमी कालावधीच्या स्वरूपात असतो. अनेकदा हा तणाव आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे ट्रिगर होतो. जसे की, ऑफिसमध्ये कामाचा भार खूप जास्त आहे, जवळच्या व्यक्तीशी वाद होणे किंवा काही दीर्घ आजारामुळे नाराज होणे. तणावाची इतर काही लक्षणे देखील असू शकतात. जसे की, राग येणे, एकटेपणा जाणवणे, चिडचिड होणे, मळमळ किंवा चक्कर येणे. अनेक बाबतीत तणाव वाढला की नैराश्यही येऊ शकते. त्यामुळे तणावाचे योग्य वेळी दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे.

चिंता (Anxiety) :
 
याला आपण दीर्घकाळची चिंता म्हणूनही म्हणू शकतो. चिंताग्रस्त व्यक्तीला अस्वस्थता, विनाकारण भीती वाटणे, घाम येणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठता, झोपेची समस्या, अस्वस्थ वाटणे यासारख्या समस्या जाणवू शकतात. Anxiety मध्ये ट्रिगर पॉईंट ओळखणे थोडे कठीण होते. कारण, व्यक्ती कशामुळे ट्रिगर झाली आहे हे साधारण या आजारात कळून येत नाही.   

मूड स्विंग (Mood Swing) :
 
मूड स्विंगची समस्या खरं तर तणाव आणि चिंतांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. मूड स्विंग्स म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या भावनिक अवस्थेत अचानक होणारा बदल. मूड स्विंग्स दरम्यान, एखादी व्यक्ती विनाकारण खूप आनंदी किंवा उत्साही वाटू शकते. तसेच, काही काळानंतर ती व्यक्ती दुःखी, चिडचिडी किंवा रागही येऊ शकतो. मूड स्विंगच्या आजारात, एखाद्या व्यक्तीच्या भावना खूप वेगाने बदलतात आणि कधीकधी त्याला स्वतःला देखील समजत नाही. आपली जीवनशैली मूड स्विंगला चालना देण्यासाठी एक प्रमुख घटक असू शकते. उदाहरणार्थ, घर किंवा नोकरी बदलणे, पुरेशी झोप न घेणे, सकस आहार न घेणे इ. याशिवाय माणसाच्या शरीरात हार्मोनल बदलही होतात. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Winter Health Tips : हिवाळ्यात डिप्रेशन आणि आत्महत्येचं प्रमाण वाढतं, 'हे' आहे कारण

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget