एक्स्प्लोर

Health Tips : हिवाळ्यातील लहान मुलांमधील अस्थमा, दम्याची लक्षणे काय? काय काळजी घ्यायची?

Health Tips : लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढले असून सर्दी खोकल्याचं व्हायरल इन्फेक्शन झालं की काहींना छातीत घरघर सुरू होते आणि धाप देखील लागते.

Health Tips : हिवाळ्यातील (Winter) कोरडी हवा श्वसनात अडथळा निर्माण करते. दम्याच्या (Asthma) रुग्णांना श्‍वसनमार्गातील सुजेमुळे ऑक्सिजन फुप्फुसांपर्यंत पोहोचण्यास अडथळा येतो आणि कोरड्या हवेमुळे हा त्रास आणखी बळावतो. या वातावरणामुळे हिवाळ्याच्या दिवसांत दम्याचा झटका येण्याचे प्रमाण वाढते. श्‍वासनलिकेवर सूज आल्यामुळे अथवा श्‍वासनलिकेमध्ये एक चिकट पदार्थ जास्त प्रमाणात स्रवण झाल्यामुळे श्‍वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्वासोच्छ्वास प्रक्रियेत अडचणी येतात.

लहान मुलांमध्ये दम्याचे (Kids' Asthma) प्रमाण वाढले असून सर्दी खोकल्याचं व्हायरल इन्फेक्शन झालं की काहींना छातीत घरघर सुरु होते आणि धाप देखील लागते. त्या मुलांच्या श्वसननलिका किंवा श्वासवाहिन्या या आकाराने लहान असतात. वयाबरोबर श्वासनलिकांचा आकार वाढला की त्यांचा दम लागण्याचा त्रास कमी होतो. व्हायरल इन्फेक्शन सोडून इतरवेळी ही मुलं बरी असतात आणि त्यांना दम लागत नाही. या आजाराला 'बालदमा' असं म्हणतात.

मुलाकडून श्वास बाहेर टाकताना छातीतून सततचा शिट्टीसारखा येणारा आवाज येत असल्यास त्याला बाल दमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते. दमा असल्याचे निदान करण्याकरिता तपासण्या करण्याची तशी गरज नसते; परंतु काही वेळा गरज पडल्यास पल्मनरी फंक्शन टेस्ट, एक्स-रे, अ‍ॅलर्जीकरिता तपासणी, रक्ताची तपासणी केली जाते.

ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. थंड हवेमुळे हिवाळ्यात दमा असलेल्या लोकांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ शकतो. छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. श्‍वसननलिकेवाटे शरीरात आलेल्या हवेतील ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचवण्याचे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडण्याचे काम फुप्फुसे करतात. मात्र दमा या आजारात श्‍वसनमार्गाला सूज आल्यामुळे ही वाहिनी आकुंचन पावते आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात फुप्फुसापर्यंत पोहोचण्यास आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्यास अडथळा येतो. श्वसनमार्गात कफ चिकटून राहिल्यामुळे श्वासोच्छवास करण्यास अडथळा निर्माण होतो. सतत खोकला येणे आणि कफ जमा होणे यामुळे रुग्ण त्रस्त होतो. त्यातच हिवाळ्यात कोरडे वातावरण असल्यामुळे दमा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढते आणि दम्याचा झटका (Asthma Attack) येण्याच्या प्रमाणातही वाढ होते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात प्रदूषण पसरते आणि हे कण अॅलर्जीचे काम करतात. त्यामुळे हिवाळ्यात दम्याचा त्रास अधिक वाढतो.

दम्याची लक्षणे

  • दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
  • श्वास घेताना घशात घरघर आवाज येतो.
  • छातीत जडपणा जाणवणे.
  • खोकल्यावर स्निग्ध कफ.
  • शारीरिक परिश्रम केल्यानंतर दम लागणे.
  • परफ्यूम, सुगंधित तेल, पावडर इत्यादींची अॅलर्जी

दमेकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

  • हिवाळ्याच्या दिवसात घरच्या घरी व्यायाम करा. यामध्ये इनडोअर जिम, वर्कआउट कोर्स आणि चालणे, योगा यांचा समावेश होतो.
  • बाहेर पडताना स्कार्फचा वापर करा. त्यामुळे श्वसन संक्रमण टाळणे शक्य होईल तसेच थंड वाऱ्यापासून संरक्षण होईल.
  • आहारात अधिकतः द्रव पदार्थांचे सेवन करा. आहारात गरम सूप, फळांचा रस यांचा समावेश करा.
  • घरात आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखा.
  • वेळोवेळी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घ्या. वैद्यकीय सल्ल्याने इनहेलर्सचा वापर करणे योग्य राहिल.
  • शरीर शक्य तितके उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा.

- डॉ तुषार पारेख, कन्‍सल्‍टंट निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, पुणे

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
जगजेत्त्या किंग कोहलीचं अलिबागमधील आलिशान घर, 13 कोटींच्या बंगल्याचे फोटो पाहिले का?
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Embed widget