Health: फक्त 30 दिवस भात खाऊ नका, मग बघा काय होतं? भातप्रेमींनो जमेल का? आरोग्य तज्ज्ञ सांगतात...
Health: आपल्या देशात अनेक ठिकाणी भात हे लोकांचे मुख्य अन्न आहे, परंतु पूर्णपणे भातावर अवलंबून राहणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Health: गरमा-गरम.. वाफवलेला...पांढरा शुभ्र भात... त्याची बिरयानी किंवा पुलाव.. काही लोकांना भात इतका आवडतो, की भाताशिवाय त्यांचं जेवण पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून त्यांना रोजच्या आहारात भात हा लागतोच. मग तो तुम्ही कसाही द्या.. तांदूळ हा महाराष्ट्रात खाल्ला जाणारा मुख्य खाद्यपदार्थ आहे. इथल्या लोकांच्या जेवणात भात नक्कीच मिळेल. महाराष्ट्रातील लोकांशिवाय इतर लोकांनाही भात आवडतो, पण तुम्हाला माहित आहे का? की जर तुम्ही रोज भात खाल्ल्याने ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते? जर पाहायचं असेल तर फक्त 30 दिवस भाताचे सेवन न केल्यास, मग बघा काय होतं ते.. अर्थात हे करताना तुमची इच्छा असेल तरच.. आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावे...जाणून घ्या सविस्तर...
पूर्णपणे भातावर अवलंबून राहू नका..
आपल्या देशात अनेक ठिकाणी भात हे लोकांचे मुख्य अन्न आहे, परंतु पूर्णपणे भातावर अवलंबून राहणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे, परंतु इतर अनेक पोषक तत्वांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत जास्त भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. यासोबतच भात खाल्ल्याने तुमचे वजनही वेगाने वाढते. 30 दिवस भाताचे सेवन न केल्यास काय फायदे होऊ शकतात ते जाणून घेऊया.
वजन कमी करण्यास उपयुक्त
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही महिनाभर भाताचे सेवन केले नाही तर तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होईल. यामुळे तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते. त्याचबरोबर आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महिनाभर भात न खाल्ल्यास तुमचे वजन कमी होऊ शकते, मात्र भातापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन न केल्यास ते फायदेशीर ठरेल.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
तांदळात जास्त प्रमाणात स्टार्च असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. हृदयविकाराचा धोका वाढवण्यात कोलेस्टेरॉल महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तांदळाचे सेवन कमी करा.
साखरेची पातळी नियंत्रणात राहील
महिनाभर भात न खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. जर तुम्ही तुमच्या आहारात कार्बोहायड्रेटयुक्त अन्नाचा समावेश केला नाही तर हे शक्य आहे.
पचनसंस्था मजबूत होते
भातामध्ये फायबरची कमतरता असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता सारखी समस्या उद्भवू शकते. त्याऐवजी तुम्ही तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. फायबर तुमची पचनक्रिया मजबूत ठेवण्यास मदत करू शकते.
या गोष्टी लक्षात ठेवा
- जर तुम्ही भात खात नसाल तर त्यामध्ये असलेल्या पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी
- तुम्ही तुमच्या आहारात इतर काही पदार्थांचा समावेश करू शकता.
- तुम्ही तांदळाचे सेवन पूर्णपणे बंद करू नये, तुम्ही ते इतर मार्गानेही सेवन करू शकता.
- प्रत्येकाचे शरीर वेगळे असते आणि त्यांना त्यांच्या शरीरानुसार पोषक तत्वांची गरज असते.
- म्हणून, आपण आपल्या आहाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा>>>
Health: बिअरमुळे कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? एका नव्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )