एक्स्प्लोर

EMM Negative : भारतात आढळला दुर्मिळ रक्त गट; देशातला पहिला आणि जगातील दहावा व्यक्ती

EMM Negative Blood Group : गुजरातमध्ये अतिशय दुर्मिळ रक्तगट असणारी देशातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तींना रक्तदानही करता येत नाही किंवा इतरांचे रक्तही घेता येत नाही.

EMM Negative Blood Group :  साधारणपणे आपल्याला चार रक्तगट माहित असतात. यामध्ये ए, बी, ओ आणि एबी असे चार रक्तगट सर्वांनाच परिचयाचे आहेत. मात्र, भारतातील डॉक्टरांना एक दुर्मिळ रक्तगट (Rare Blood Group) आढळून आला आहे. हा रक्तगट असणारी व्यक्ती ही भारतातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याची बाब समोर आली आहे. EMM Negative  असा हा दुर्मिळ रक्तगट आहे. 

गुजरातमध्ये ही दुर्मिळ रक्तगट असलेली व्यक्ती आढळली आहे. वय वर्ष 65  असलेल्या या व्यक्तीला हृदयविकाराचा आजार आहे. 

मानवी शरीरात चार रक्तगट असतात. त्याशिवाय, शरीरात ए, बी, ओ, आएच आणि Duffy सारख्या 42 प्रकार असतात. त्याशिवाय 375 अॅण्टीजेन असतात. यामध्ये EMM चे प्रमाण अधिक असतात. EMM अॅण्टीजेन नैसर्गिकपणे शरीरात विकसित होतात. मात्र, पुरेशा प्रमाणात EMM नसल्याने त्यांना EMM निगेटीव्ह असे म्हटले जाते. 

मात्र, जगातील फक्त 10 जणांच्या शरीरात EMM चे प्रमाण अधिक नसल्याचे समोर आले आहे. EMM चे प्रमाण कमी असल्याने हे इतरांपेक्षा वेगळ्या व्यक्ती आहेत. हा दुर्मिळ रक्तगट असल्याने या व्यक्ती इतरांना रक्तदान करू शकत नाही, अथवा त्यांना इतर रक्तगटांच्या व्यक्ती रक्त देऊ शकत नाही. 

गुजरातमधील राजकोट येथे 65 वर्षीय व्यक्तीमध्ये हा दुर्मिळ रक्तगट आढळला आहे. समर्पण रक्तदान केंद्रातील डॉक्टर सन्मुख जोशी यांनी सांगितले की, या 65 वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथे हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रक्ताची आवश्यकता होती. मात्र, अहमदाबाद येथील रक्तपेढीत त्यांच्या रक्तगटाचे उपलब्ध झाले नाही. त्यानंतर सुरत येथील रक्तपेढीत त्यांच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली. 

या रक्तगटाची चाचणी केल्यानंतर हे रक्त कोणत्याही रक्तगटाशी जुळत नव्हते. त्यानंतर या व्यक्तींच्या नातेवाईकांनी रक्ताचे नमुने तपासणीसाठी अमेरिकेत पाठवले. त्यावेळी त्यांचा रक्त गट दुर्मिळ असल्याची बाब समोर आली. भारतातील हा पहिलाच रक्तगट असून जगातील दहावी व्यक्ती असल्याचेही समोर आले. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Mahadev Munde case: महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडणार?
महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत सापडणार?
Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा
सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा, भंडाऱ्यातील घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरेDnyaneshwari Munde  Mahadev Munde  खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासनABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Mahadev Munde case: महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडणार?
महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचं मोठं आश्वासन, वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत सापडणार?
Bhandara News : सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा
सनफ्लॅग कंपनीत क्रेनचा हुक अंगावर पडून दोन कामगार गंभीर; जखमींच्या नातेवाईकांकडून आंदोलनचा इशारा, भंडाऱ्यातील घटना
Accident : पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
पुणे बंगळूर महामार्गावर तांदूळवाडीजवळ एसटीचा अपघात; हायवेवरून कठडा तोडून खाली उतरली
मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुलेविषयी महत्त्वाचे पुरावे सापडले, SIT चा बीड न्यायालयाकडे महत्त्वाचा अर्ज
मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुलेविषयी महत्त्वाचे पुरावे सापडले, SIT चा बीड न्यायालयाकडे महत्त्वाचा अर्ज
Sanjay Raut : एकनाथ शिंदे, अजितदादांचा पक्षही फुटणार, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपच्या तोंडाला रक्त...
एकनाथ शिंदे, अजितदादांचा पक्षही फुटणार, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, भाजपच्या तोंडाला रक्त...
Manoj Jarange Patil: पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी,  जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'
पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी, जरांगे म्हणाले, 'आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही'
Embed widget