Coronavirus : तुमच्या फोनवरही कोविड व्हायरस? मोबाईलमुळे कोरोना विषाणू पसरला? संशोधनात धक्कादायक माहिती उघड
Covid-19 Spread by Mobile : संपूर्ण जग कोरोना महामारीतून आता कुठे सावरत आहे. कोविड-19 संदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
मुंबई : कोरोना महामारी (Coronavirus Outbreak) आली आणि यामुळे जणू संपूर्ण (World) जगच थांबलं गेलं होतं. आता तीन वर्षांनंतर कोरोना महामारीतून जग सावरत आहे. परिस्थिती आता पूर्ववत होत आहे. कोरोना महामारीमुळे जगभरात अनेकांचा मृत्यू झाला. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं. आता कोरोना व्हायरस संदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, कोरोना विषाणू मोबाईलमुळे (Mobile Phone) परसल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोना संदर्भातील या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जगभरात कोरोना महामारी परसली होती, तेव्हा 45 टक्के कोरोना विषाणूचा प्रसार हा मोबाईल फोनमुळे झाला.
मोबाईलमुळे पसरला कोविड व्हायरस
कोरोना विषाणू आणि मोबाईल संबंधित हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, कोरोना विषाणू पसरण्यासाठी मोबाईल हेही एक माध्यम होतं. कोरोना काळात लोकांनी मोबाईलच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही. लोकांनी इतर वस्तू साफ आणि स्वच्छ ठेवण्यावर भर दिला पण, मोबाईलच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं. यामुळे हा आजार अधिक पसरण्यास मदत झाली आणि इंफेक्शन जास्त प्रमाणात पसरलं.
कोविड संदर्भातील धक्कादायक अहवाल
या संशोधनाच्या अहवालानुसार, कोरोना महामारीच्या काळात मोबाईल फोनच्या वापरातही वाढ झाली. यावेळी लोकांनी मोबाईल फोनची स्वच्छता राखली नाही. ऑस्ट्रेलियाच्या बाँड विद्यापिठातील संशोधकांना याबाबतच्या संशोधनानंतर महत्त्वाचा अहवाल मांडला आहे. संशोधकांनी 10 देशांमधील मोबाईल फोनवर आधारीत अभ्यासानंतर हा अहवाल मांडला आहे.
संशोधनात काय समोर आलं?
अहवालानुसार, 45 टक्के कोविड विषाणू हे मोबाईल फोनमुळे पसरले. संशोधकांनी 2019 पासून ते 2023 या काळात कोविड इंफेक्शन (SARS-CoV-2) च्या प्रसाराचं माध्यम जाणून घेण्यासाठी मोबाईल फोनची तपासणी केली. यामध्ये 45 टक्के मोबाईल फोनमध्ये कोविड-19 व्हायरस असल्याचं अभ्यासात आढळून आलं. या अभ्यासात आढळलं की, सिडनीमध्ये जेव्हा कोरोनाचा कहर सुरु होता, तेव्हा सुमारे 50 टक्के मोबाईल फोन्सवर कोविड विषाणू होते. सिडनीमधील 511 पैकी 231 मोबाईल फोनवर कोविड व्हायरस आढळला. इंफेक्शन एंड पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरस मोबाईल फोनवर किती काळ राहतो?
बाँड युनिव्हर्सिटीचे प्रमुख संशोधक डॉ. लोटी ताजौरी यांनी सांगितलं की, लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग असूनही कोरोना विषाणू वेगाने पसरल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये मोबाईल फोन हे एक महत्त्वाचं कारण आहे. याआधीच्या संशोधनात असं आढळून आलं होतं की, SARS-Cov-2 विषाणू कोणत्याही मोबाईल फोनच्या स्क्रिनवर किंवा काचेवर 28 दिवस जिवंत राहू शकतो.
डॉक्टरांनी याबाबत अधिक माहिती देत सांगितलं की, सध्या जगात सात अब्जाहून अधिक मोबाईल फोन युजर्स आहेत. तुम्ही कितीही वेळा हात धुतले तरी, मोबाईलला स्पर्श करताच तुम्हाला विषाणूची लागण होते.
रुग्णालयातील बाल अतिदक्षता आणि बालरोग ICU वॉर्डमध्ये केलेल्या अभ्यासात आढळलं की, 26 आरोग्य सेवकांच्या मोबाईल फोनवर 11,163 रोगजंतू आढळले. ज्यामध्ये विषाणू आणि बॅक्टेरिया देखील होते.
फोनचा संसर्ग कसा टाळता येईल?
1. टच स्क्रीन स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी, किमान 70 टक्के अल्कोहोल असलेले वाइप किंवा स्प्रे वापरा.
2. घराबाहेर पडताना फोन खिशात, पर्स, बॅग किंवा कारमध्ये ठेवा. यामुळे फोन हवेतील विषाणूंच्या संपर्कात जास्त येणार नाही.
3. खरेदी करताना मोबाईल फोनवर नव्हे तर हाताने कागदावर लिहून यादी तयार करा.
4. कोणत्याही गोष्टीसाठी क्रेडिट-डेबिट कार्डने पैसे द्या, घराबाहेर मोबाईल फोनचा वापर कमी करा.
5. सार्वजनिक ठिकाणी फोनचा वापर हात धुवल्यानंतर किंवा स्वच्छ केल्यानंतरच करा.
6. कॉल करताना फक्त हँड्स-फ्री डिव्हाइस वापरा.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )