Health Tips : पावसाळ्यात ताप येण्याची सामान्य लक्षणं कोणती आणि यावर उपाय काय? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Monsoon Health Tips : पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार उद्भवतात. अशा वेळी हा आजार कसा ओळखायचा आणि त्याची लक्षणं कोणती हे जाणून घ्या.
Monsoon Health Tips : कडक उन्हाळ्यापासून आता थंडगार पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरु होऊन साधारण दीड महिना झाला आणि वातावरणात बदल जाणवू लागले. पावसाळ्यात ताप येणे, सर्दी, खोकला ही तर सामान्य लक्षणं आहेत. परंतु, याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केले तर मात्र याचे गंभीर परिणाम होतात.
पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार उद्भवतात. अशा वेळी हा आजार कसा ओळखायचा आणि त्याची लक्षणं कोणती या संदर्भात मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशलिस्ट डॉ. स्वाती मिश्रा यांनी काही टीप्स दिल्या आहेत.
डासांमुळे होणारे संक्रमण :
1. मलेरिया
डासांमुळे होणारे आजार हे तर पावसाळ्यातील सर्वात सामन्य लक्षण आहे. अॅनोफेलिस डासामुळे मलेरियासारखा आजार होतो. यामुळे तुमचं शरीर थरथर कापू लागतं, अचानक थंडी वाजू लागते, अंगदुखी आणि घाम येणे यांसारखी लक्षणं दिसतात. मलेरियाच्या परजीवीच्या जीवनचक्रामुळे चक्रे मानवी शरीरात प्रजनन प्रक्रिया विकसित करतात
2. डेंग्यु
एडिस इजिप्ती डास या मादीच्या डासामुळे डेंग्यु होतो. डेंग्युची सर्वसामान्य अशी काही लक्षणं आहेत. यामध्ये रूग्णांना अचानक ताप येतो आणि जातो. ्वचेवर पुरळ येतात. मोठ्या प्रमाणात डोकेदुखी होते. डोळ्यांची जळजळ, स्नायूदुखी यांसारखी लक्षणं दिसतात.
पाण्यामुळे होणारे संक्रमण
1. टायफॉईड
टायफॉईड हा आजार दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने होतो. यामुळे हिवताप, पोटात दुखणे, डोकेदुखी ही काही लक्षणं आहेत. टायफॉईड या आजारामध्ये दिवसभर तुम्हाला ताप चढतो तर सकाळी कमी होतो.
2. गॅस्ट्रोएन्टेरिटिस
या आजारामुळे पोटात जळजळ होते आणि पोटात कळा येऊ लागतात. गॅस्ट्रोएन्टेरिटिस हा आजार अयोग्य पाणीसाठ्यामुळे होतो. यामुळे पाणचट मल, पोटात जळजळ होणे, उलट्या होणे, पोटात पेटके येणे, पोटात मळमळ होणे यांसारखी लक्षणं जाणवतात.
हवेतील बदलामुळे होणारे संक्रमण :
1. ताप येणे
पावसाळ्यात होणारा सर्वसामान्य आजार म्हणजेच ताप. यामध्ये ताप येतो, शिंका येणे, घसा सुकणे, थकवा जाणवणे अनुनासिक स्त्राव यांसारखी लक्षणं जाणवतात.
2. फ्ल्यू
पावसाळ्यात होणारा फ्ल्यू चा संसर्ग हो देखील सर्वसामान्य आजार आहे. यामध्ये ताप, खोकला, सर्दी, घसा दुखणे श्वास घेण्यास त्रास, सांधेदुखी आणि डोकेदुखी यांसारखी सामान्य लक्ष जाणवतात.
3. कोरोना
आपणा सर्वांनाच माहीत आहे मागच्या दोन वर्षांपासून जगभरात ज्या आजाराने दहसत निर्माण केली होती असा आजार म्हणजे कोराना. या आजारात सर्दी, खोकला, घसा सुकणे, नाकाला वास न जाणवणे, किंवा तोंडाची चव जाणे ही सामन्य लक्षणे आहेत. ही सामान्य लक्षणं असली तरी काही लोकांमध्ये डोळे गुलाबी होणे, अंगदुखी, हिवताप आणि उलट्या होणे यांसारखी सुद्धा लक्षणं दिसत होती.
या आजारांपासून सुटका मिळविण्यासाठी काय करावे?
- घरी राहून शरीराच्या गरजेनुसार आराम करणे.
- जास्तीत जास्त द्रवपदार्थांचे सेवन करावे.
- सुती कापड, हलके कपडे घाला.
- ताप कमी करणाऱ्या औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करा.
महत्वाच्या बातम्या :
- Monsoon Immunity : पावसाळ्यात 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा, आजारांपासून सुरक्षित राहा
- Heart Health : पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका अधिक, काय आहे यामागचं कारण? हे वाचा
- Retina Health : नजर कमकुवत होण्याला आजाराबरोबरच अनुवांशिकताही असू शकते जबाबदार! जाणून घ्या...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )