Child Health: दिवाळीत फटाक्यांचा धूर दृष्टी हिरावून घेऊ शकतो? पालकांनो आताच सावध व्हा..'अशी' घ्या काळजी
Child Health: फटाक्यांचा धूर मुलांच्या डोळ्यांसाठी खूप हानिकारक असतो. या धुरामुळे मुलांच्या डोळ्यांना कसे नुकसान होते? जाणून घ्या..
Child Health: दिवाळी येणार म्हणून सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, कुठे कपडे खरेदी, कुठे साफसफाई, कुठे फटाके आणि दिव्यांचे स्टॉल, तर कुठे रांगोळ्याची दुकानं..एकंदरीत पाहायला गेलं तर दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा आणि आनंदाचा सण. दीपोत्सव जवळ आल्याने याची उत्सुकता सर्वांनाच दिसते. या दिवशी लोक आपापल्या घरी दिवे लावतात, मिठाई वाटतात, रांगोळी काढतात आणि विविध प्रकारची मिठाई खातात आणि उत्सव साजरा करतात. या उत्सवात अनेकजण फटाकेही फोडतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण घरात फटाके फोडताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की फटाक्यांमधून निघणारा धूर ना तुमच्या आरोग्यासाठी चांगला असतो, ना पर्यावरणासाठी... फटाक्याचे दुष्परिणाम मुलांच्या डोळ्यांसाठी खूप हानिकारक असतात. यामुळे तुमच्या मुलांची दृष्टीही हिरावून घेतली जाऊ शकते. त्यामुळेच आतापासून सावध राहायला हवे. फटाक्यांच्या धुरामुळे मुलांच्या डोळ्यांना कसे नुकसान होते ते जाणून घेऊया.
फटाक्यांमुळे काय नुकसान होते?
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे मुलांच्या डोळ्यांना इजा होऊ शकते. फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरात अनेक घातक रसायने असतात. ज्यामुळे मुलांच्या डोळ्यात जळजळ होऊ शकते. यामुळे वेदना होऊ शकतात आणि खूप नुकसान देखील होऊ शकते. जेव्हा लहान मुलं या धुराच्या संपर्कात येतात, तेव्हा याचे लहान कण त्यांच्या डोळ्यांत जाऊ शकतात, ज्यामुळे डोळ्यांमध्ये लालसरपणा, खाज सुटणे आणि डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो.
फटाक्यांचा धूर मुलांच्या आरोग्यासाठी कितपत धोकादायक?
फटाक्यांमधून निघणारा धूर लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक समजला जातो. मुलांची प्रतिकारशक्ती अजूनही विकसित होत असते. फटाक्यांच्या धुरात शिसे आणि बेरियम सारख्या हानिकारक घटक असतात, ज्यामुळे ऍलर्जी होऊ शकते आणि कॉर्निया (डोळ्याचा पारदर्शक भाग जो दृष्टीसाठी आवश्यक आहे) तो खराब होऊ शकतो. या धुराच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डोळ्यांमध्ये सतत कोरडेपणा येऊ शकतो, ज्यामुळे पाहण्यात अडचण येते आणि डोळ्यांना इतर नुकसान होऊ शकते.
फटाक्यांमुळे अंधपणा येऊ शकता का?
फटाक्यांच्या धुरात प्रदूषक असतात. यामुळे मुलांमध्ये तात्पुरते अंधत्व आणि प्रकाशाची संवेदनशीलता वाढू शकते, ज्यामुळे त्यांना बाहेर खेळणे आणि इतर एक्टिव्हिटीत भाग घेणे कठीण होऊ शकते. यासोबतच प्रदूषित वातावरणामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला दाह होण्याचा धोकाही वाढतो, जो मुलांमध्ये वेगाने पसरतो.
डोळ्यांसाठी गंभीर समस्या असू शकतात
फटाक्यांच्या धुराचा धोका इथेच संपत नाही. तर अशा प्रकारच्या प्रदूषणाच्या नियमित संपर्कामुळे डोळ्यांमध्ये गंभीर आणि दीर्घ समस्या उद्भवू शकतात, जसे की मोतीबिंदू, ज्याचा कालांतराने डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे धोके लक्षात घेऊन, या धोक्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी पालकांनी योग्य पावले उचलणे महत्त्वाचे आहे.
फटाक्याच्या धुरापासून मुलांचे संरक्षण कसे कराल?
- मुलांना फटाक्यांच्या धुरापासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे,
- कारण त्यांचे डोळे विशेषतः संवेदनशील असतात
- हानिकारक धूर आणि वायू कायमचे नुकसान करतात.
- त्यामुळे अजिबात फटाके न पेटवण्याचा प्रयत्न करा,
- पण तुमच्या आजूबाजूचे लोक फटाके पेटवत असतील तर
- मुलांना तेथून दूर ठेवा आणि तुम्ही स्वतःही तिथून दूर राहा.
हेही वाचा>>>
Diwali 2024: दिवाळीच्या फोटोंमध्ये दिसाल स्लिम-ट्रीम! फक्त पोज देताना 'या' ट्रिक्स फॉलो करा अन् कमाल बघा, लाईक्सवर लाईक्स येतील
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )