एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Brain Eating Amoeba : 14 वर्षाच्या मुलाला मेंदू खाणाऱ्या अमिबाची लागण, केरळमध्ये चौथा रुग्ण आढळला; दुर्मिळ प्राणघातक संसर्गाची लक्षणे काय?

Brain Eating Amoeba : केरळमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाला दुर्मिळ प्राणघातक मेंदू खाणाऱ्या अमिबाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

Brain Eating Amoeba : कोरोनानंतर आता दुर्मिळ आणि प्राणघातक ब्रेन इटिंग अमिबा (Brain Eating Amoeba) या संसर्गाने चिंता वाढवली आहे. एका 14 वर्षांच्या मुलाला दुर्मिळ प्राणघातक मेंदू संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. केरळमधील पायोली येथील एका मुलाला मेंदू खाणाऱ्या अमिबाची लागण झाली आहे.  केरळमधील मे महिन्यापासूनची हे चौथं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणांमध्ये सर्व मुलांचा समावेश आहे, त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये ब्रेन इटिंग अमिबाचा चौथा रुग्ण आढळला

मेंदू खाणाऱ्या अमिबाबाबतची भीती आरोग्यमंत्र्यांनी दूर केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 5 जुलै रोजी एक बैठक घेतली, ज्यामध्ये पुढील संसर्ग टाळण्यासाठी अशुद्ध पाण्याच्या ठिकाणी आंघोळ करू नये, यासह अनेक सूचना देण्यात आल्या. या बैठकीत जलतरण तलावांचे योग्य क्लोरीनेशन व्हावे आणि लहान मुलांनी पाणवठ्यांमध्ये प्रवेश करताना काळजी घ्यावी, कारण त्यांना या आजाराची सर्वाधिक लागण होते, असेही निवेदनात म्हटलं आहे.

ब्रेन इटिंग अमिबा किंवा PAM म्हणजे काय?

पॅम (PAM) हा आजार नेग्लेरिया फाऊलेरीची (Naegleria Fowleri)  नावाच्या अमिबा मुळे होतो, एक अमीबा यालाच मेंदू खाणारा अमिबा, असंही म्हणतात. या आजाराला Primary Amoebic Meningoencephalitis (PAM) असंही म्हटलं जातं. हा अमिबा उबदार गोड्या पाण्यात आढळतो. दूषित पाण्याद्वारे याचा संसर्ग होतो. 

मेंदू खाणाऱ्या अमिबाचा संसर्ग कसा होतो?

तलाव, नद्या आणि दूषित पाणी किंवा कमीत कमी क्लोरीनयुक्त तलाव यांसारख्या उबदार गोड्या पाण्याच्या वातावरणात नेग्लेरिया फॉवलेरी अमिबा वाढतात. जेव्हा दूषित पाणी नाकात जाते, तेव्हा हा अमिबा शरीरात प्रवेश करतो आणि मेंदूमध्ये त्याचा संसर्ग होतो. या अमिबामुळे मेंदूंच्या ऊती नष्ट होऊन खूप नुकसान होते आणि मेंदूला सूज येते. हा अमिबा थेट मानवाच्या मेंदूवर हल्ला करतो आणि त्यामुळे मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट होतात. 

मेंदू खाणाऱ्या अमिबाची लक्षणे काय?

PAM ची सुरुवातीची चिन्हे सामान्य आजारांसारखी आहेत. डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या ही याची सुरुवातीची लक्षणं आहेत. यानंतर टप्प्यांमध्ये मान ताठ होणे, गोंधळल्यासारखे वाटणे, भ्रमिष्ट होणे ही लक्षणे दिसतात. यामध्ये शेवटच्या स्टेजमध्ये रुग्ण कोमामध्ये जाण्याची दाट शक्यता असते. हा रोग झपाट्याने वाढतो, अनेकदा लक्षणे दिसू लागल्यानंतर काही दिवसात रुग्णाचा मृत्यू होतो.

मुलांचे संसर्गापासून संरक्षण कसे करावे?

  • उबदार गोड्या पाण्याची ठिकाणे किंवा थर्मल पूलपासून दूर रहा.
  • मुलांनी थर्मल पूल आणि उबदार गोड्या पाण्यात डोके पाण्याच्या वर ठेवावं आणि नाक-तोंडात पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • तुमच्या मुलाला फक्त क्लोरीनयुक्त, स्वच्छ आणि सुस्थितीत असलेल्या जलतरण तलावांमध्ये पाठवा.
  • पोहताना मुलांना नोज क्लीप लावा.
  • नळी किंवा स्प्रिंकलरने खेळणाऱ्या मुलांचे निरीक्षण करा आणि त्यांना नाकात पाणी न टाकण्यास शिकवा.

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Embed widget