Blue Tea Benefits: आरोग्यासाठी लाभदायी ब्लू टी, जाणून घ्या फुलांपासून बनविलेल्या 'या' चहाबद्दल
भारतीय लोकांसाठी 'ब्लू टी' हा मुळातच नवीन प्रकार आहे. यालाच बटरफ्लाय टी म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा चहा ब्लू बटरफ्लाय म्हणजेच अपराजिताच्या फुलांपासून बनवला जातो. या चहाचा शरीरासाठी खूप फायदा होतो.
Blue Tea Benefits : भारतात लोक चहाचे दिवाने आहेत. अनेकांची दिवसाची सुरूवातच मॉर्निंग टी पासून होते. ब्लॅक टी , ग्रीन टी, हर्बल टी आणि दुधाचा चहा हे आपल्या रोजच्या दैनंदिनीतले पेय आहेत. पण तुम्ही 'ब्लू टी' बद्दल ऐकले आहे काय आजकाल ब्लू टी' अनेक लोकांच्या पसंतीस पडत आहे. 'ब्लू टी' चे शरीरास हेल्थी ठेवण्यासाठी अनेक निरनिराळे फायदे आहेत. जाणून घेऊया..
'ब्लू टी'ला बटरफ्लाय टी असेही म्हणतात. हा चहा ब्लू बटरफ्लाय म्हणजेच अपराजिताच्या फुलांपासून बनवला जातो. हा चमकदार रंगाचा चहा आहे. हा चहा प्यायल्याने त्वचेसोबतच शरीरालाही अनेक फायदे होतात. अपराजिताची फुलेमुख्यतः व्हिएतनाम, थायलंड, बाली आणि मलेशिया या देशांमध्ये आढळतात. तथापि, फूड आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉगमुळे लोकप्रिय झालेल्या या चहाबद्दल लोकांना माहिती होऊ लागली आहे. आता त्याची ओळख होत असून या फुलाचा हळूहळू रोजच्या आयुष्यात समावेश होत आहे.
'ब्लू टी' कसा बनवला जातो
'ब्लू टी' बनवण्यासाठी एका भांड्यात एक कप पाणी उकळा. पाणी गरम झाल्यावर त्यात अपराजितची फुले घाला. 3 ते 4 फुले टाका आणि नंतर उकळू द्या. चहाला उकळी आल्यावर गॅस बंद करा. आता एका मोठ्या कपमध्ये तयार झालेला निळा चहा गाळून घ्या. त्यात एक चमचा मध टाका आणि मग या चहाच्या आनंद घ्या.
'ब्लू टी' पिण्याचे फायदे
प्रतिकारशक्ती वाढवते
तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'ब्लू टी' खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यात अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. याशिवाय ब्लू टीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात.एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, हा चहा शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखण्याचे काम करतो.
स्मरणशक्ती वाढवते
बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाल्ले जाते. 'ब्लू टी' मध्ये देखील असे अनेक गुणधर्म आहेत जे तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास खूप मदत करू शकतात. हा चहा तणाव कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो. अल्झायमरच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही ब्लू टी खूप फायदेशीर आहे. हा चहा प्यायल्यानंतर माणसाला खूप आराम वाटतो.
ब्लड शुगर नियंत्रीत ठेवण्यास मदत करते
मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लू टी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह होण्याचा धोकाही कमी होतो. या चहामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात.
डोळ्यांसाठी खूप फायदेशीर
निळा चहा प्यायल्याने दृष्टी वाढण्यास मदत होते. या चहामुळे डोळ्यांशी संबंधित समस्याही दूर होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास ब्लू टी' मदत करते. तसेच दृष्टी आणि स्मरणशक्ती सुद्धा वाढवते. दररोज ब्लू टी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, मग आताच हा चहा वापरून पाहा.
ही बातमी वाचा
Aaliya Kashyap : अनुराग कश्यपच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा; रोमॅंटिक फोटो शेअर करत म्हणाली...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )