एक्स्प्लोर

Weight Loss Tips : अनोशेपोटी 'या' तीन ड्रिंक्सचं सेवन करा, व्यायामाविना होईल वजन कमी

Weight Loss Drink : लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकाळी अनोशेपोटी या तीन ड्रिंक्सचं सेवन केल्यास वजन लवकर कमी होईल.

Morning Empty Stomach Drinks To Lose Belly Fat : सध्या अनेक जण लठ्ठपणाच्या समस्येनं त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. काही जण व्यायाम, योगा, स्विमिंग तर काही जण डाएट करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे वेळीच वजन नियंत्रित करणं गरजेच आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे वजन वाढतं. तुम्ही व्यायाम न करताही वजन कमी करु शकता. त्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत. या उपायांचा अवलंब केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

लठ्ठपणा दूर करायचा असेल तर सकाळी उठताच गरम पाणी पिण्याची सवय लावून घ्या. मात्र तुम्हाला साधं पाणी नाही प्यायचंय. एक दिवस मेथीचं पाणी, दुसऱ्या दिवशी तमालपत्राचं पाणी तर तिसऱ्या दिवशी ओव्याचं पाणी प्या. कसं ते जाणून घ्या. वजन कमी करण्यासाठी सकाळी अनोशेपोटी 'या' तीन ड्रिंक्सचं सेवन केल्यानं तुम्हाला फायदा होईल.

अनोशेपोटी 'या' तीन ड्रिंक्सचं सेवन करा

1. मेथीचं पाणी

यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी भिजत घालायची आहे. मेथी रात्रभर पाण्यात भिजू द्या. सकाळी हे पाणी गाळून घ्या. त्यानंतर हलकं कोमट करुन या पाण्याचं सेवन करा. या ड्रिंकचं सेवन केल्यानं तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होईल. शिवाय गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासूनही तुमची सुटका होईल.

2. तमालपत्राचं पाणी

तमालपत्र अर्थात तेजपत्ता याचं पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाणी उकळावा. आता त्यात एक-दोन तमालपत्र टाका. यानंतर पाणी सुमारे 2 मिनिटं उकळवा. हे पाणी गॅस बंद करून दोन मिनिटं झाकून ठेवा. आता हे ड्रिंक गाळून गरम चहासारखं प्या. या पाण्याच्या सेवनामुळे पोट आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतील आणि वजनही कमी होईल.

3. ओव्याचं पाणी

ओवा वजन कमी करण्यास मदत करतो. ओव्याचं पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक छोटा चमचा ओवा भिजवा. हे रात्रभर भिजू द्या. सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी याचं सेवन करा. यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. तसेच गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा पचनाशी संबंधित समस्या दूर होतील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर संबंधित बातम्या

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget