(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ॲस्ट्राझेनेकाने कोविशिल्डच्या लसी परत मागवल्या, सीरम इन्स्टिट्यूटनं दिली मोठी अपडेट
Covishield: ॲस्ट्राझेनेकाने करोना प्रतिबंधक लसी जगभरातील बाजारातून मागं घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटनं मोठी अपडेट दिली आहे.
नवी दिल्ली : ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाने (Astrazeneca ) कोरोना प्रतिबंधक लस जगभरातून मागं घेतली आहे.कोविशिल्ड लसीचे दुष्परिणाम होत असल्याचं कंपनीनं मान्य केल्यानंतर या लसी परत मागवण्याचा निर्णय घेतला. भारतात कोविशिल्ड लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टियूटनं मोठी अपडेट दिली आहे.सीरमनं ( Serum Institute of India) म्हटलं की मागणी घटल्यानं आम्ही डिसेंबर 2021 मध्ये उत्पादन बंद केलं होतं.
भारतात 2021 आणि 2022 मध्ये मोठ्या प्रमाणावर करोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली होती. त्याचवेळी भारतात करोनाचे नवे वेरियंट स्ट्रेन आढळून येते होते. मात्र, त्याचवेळी डिसेंबर 2021 पासून कोरना प्रतिबंधक लसींची मागणी घटली होती. त्यामुळं आम्ही कोविशिल्ड लसींची निर्मिती आणि पुरवठा थांबवला होता, असं सीरमनं म्हटलं आहे.
लसीचे दुष्परिणाम असल्याचं ॲस्ट्राझेनेकाकडून मान्य
ॲस्ट्राझेनेकाने जगभरातून करोना प्रतिबंधक लसी माघारी घेतल्यानंतर सीरमच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेकाने करोना प्रतिबंधक लसीची निर्मिती केली होती. नुकत्याच एका न्यायालयात त्यांनी थ्रोमबोसिस आणि थ्रोम्बोसायटोपेनियाचे दुर्मिळ दुष्परिणाम दिसून आहेत, अशी माहिती दिली होती.
भारतात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा लसीकरणासाठी वापर करण्यात आला होता. यामध्ये कोविशिल्ड लसीचं प्रमाण 80 टक्के होतं.
ॲस्ट्राझेनेकाने जारी केलेल्या पत्रकात ते लसीच्या मार्केटिंगसंदर्भात वॅक्झेवरियाला दिलेली परवानगी काढून घेत असल्याचं म्हटलं. करोना उद्ययावत लसींची उपलब्धता आवश्यकतेपेक्षा जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं.
सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रवक्त्यांनी लोकांच्या या संदर्भातील अडचणी आणि प्रश्न समजून घेऊ शकतो, असं म्हटलं. टीटीएसमुळं रक्ताच्या गाठी निर्माण होतात त्याचसोबत पेशींची संख्या देखील कमी होते. ही शक्यता दुर्मिळ असून गंभीर असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलंय. भारतात टीटीएसचा आजार आढळून आलेला नाही. मात्र, यूकेमध्ये काही नागरिकांमध्ये टीटीएसचे आजार दिसून आले आहेत.
संबंधित बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )